शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

PHOTOS: मनालीमध्ये थंडीचा कहर, मायनस झालं तापमान; गोठू लागले नदी-नाले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 11:29 AM

1 / 6
मनालीमध्ये (Manali) सध्या थंडीने कहर केला आहे. स्थानिक लोक थंडीपासून वाचण्यासाठी गरम कपड्यांसोबतच आगीची मदत घेत आहेत. इथे तापमान मायनसमध्ये गेल्याने आता पिण्याच्या पाण्याचे पाईपही गोठले आहेत. ज्यामुळे इथे पिण्याच्या पाण्याची समस्या होऊ लागली आहे. (Imgae Credit :News18)
2 / 6
हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) मनालीतील लाहोल स्पीतीमध्ये थंडीचा कहर सतत सुरू आहे. डिसेंबर संपत आला आहे, अशात थंडीचा पारा फारच चढला आहे. संपूर्ण उत्तर भारतात थंडीचा तडाखा जाणवत आहे. अनेक ठिकाणी शरीर गोठवणारी थंडी पडली आहे.
3 / 6
एकीकडे थंडी मैदानी भागात आपलं खतरनाक रूप दाखवत आहे तर दुसरीकडे डोंगरी भागात तर परिस्थिती त्याहून वाईट आहे. डोंगरांवरील तापमान मायनस झालं आहे. ज्यामुळे येथील लोकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.
4 / 6
मनालीतील लाहोल स्पीतीमध्ये थंडीमुळे हाल बेहाल झाले आहेत. इतकंच नाही तर थंडी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ज्यामुळे लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
5 / 6
थंडीचा कहर इतका जास्त वाढला आहे की, येथील अनेक भागांमध्ये नदी-नाले गोठले आहेत. लाहोल स्पीती या पर्यटन स्थळातील तलावही मायनस तापमानामुळे गोठला आहे. वाहतं पाणीही गोठून बर्फ होत आहे.
6 / 6
स्थानिक लोकांनी सांगितलं की, इथे सकाळी आणि सायंकाळी तापमान मायनस राहतं. ज्यामुळे येथील नदी-नाले गोठण्यास सुरूवात झाली आहे. असं असलं तरी दिवसा तापमान काही वेळ सामान्य राहतं.
टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशTemperatureतापमान