Manchineel tree the most dangerous tree of the world apple of death
सावधान! 'या' झाडाची सावली अन् फळाचा एक तुकडाही बनू शकतं तुमच्या मृत्यूचं कारण By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 11:45 AM1 / 5आजपर्यंत तुम्ही अनेक फळं खाल्ली असतील मात्र आज आम्ही तुम्हाला अशा फळाबद्दल सांगणार आहोत, की ज्या फळाचा एक तुकडाही खाल्ल्याने तुमचा जीव जाऊ शकतो.2 / 5हे फळ ज्या झाडाला येते त्या झाडातील प्रत्येक भागात विष आहे. इतकचं नाही तर या झाडाच्या सावलीतही उभं राहिल्यास मृत्यू होऊ शकतो. 3 / 5फ्लोरिडा इंस्टिट्यूट ऑफ फूड अँन्ड अँग्रिकल्चर सायन्सच्या दाव्यानुसार मंचीनीलचा प्रत्येक भाग विषारी आहे. या झाडाच्या संपर्कात येणे आणि त्याचे सेवन करणे धोकादायक आहे. या झाडातून दूधाच्या रंगाचा एक द्रव्यपदार्थ बाहेर येतो. याचा एकही थेंब जर तुमच्या अंगावर पडला तर त्याने मोठ्या प्रमाणात शरीराची आग होते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात अशा झाडाखाली उभं राहणेही धोकादायक आहे. 4 / 5मंचीनील झाडाच्या लाकडांना जाळल्यानंतर त्यातून निर्माण होणाऱ्या धुराने माणसाच्या डोळ्यांना सूज येते. तसेच दृष्टी जाण्याची शक्यता बळावते. या झाडाचे फळ खाल्ल्यानंतर उल्टी होऊन जीव जाण्याची शक्यता आहे. 5 / 5या झाडाचं नाव मंचीनील ट्री म्हणून ओळखलं जातं. मात्र या झाडाचं फळ मृत्यूच फळ म्हणून प्रसिद्ध आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार जगातील सर्वाधिक धोकादायक झाड मंचीनील आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications