Marlee Liss forgave her rapist and now helps other survivors of sexual assault heal
प्रेरणादायी! आपल्या रेपिस्टला समोर बसवून त्याच्याशी ४ तास बोलली, गुन्ह्यासाठी माफीही दिली.... By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 12:47 PM1 / 8लैंगिक अत्याचाराची शिकार झालेली कॅनडातील २५ वर्षीय मार्ली लिस तिच्यासोबत झालेल्या अत्याचाराला विसरून ती इतर पीडित महिलांची मदत करत आहे. ओंटोरिया इथे राहणारी मार्ली लिस सांगते की, तिला पूर्ण फोकस गुन्हेगाराला शिक्षा मिळवून देण्यापेक्षा पीडितेंच्या जखमा भरणं आणि त्यांना नव्या जीवन जगण्याची कला शिकवणं यावर असेल. (Photo Credit: Instagram: @marleeliss)2 / 8कॅनडातील स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, मार्ली लिसने २०१९ मध्ये आपल्या रेपिस्टचा(रेस्टोरेटिव जस्टिस प्रोसेस) साधारण ४ तास सामना केला होता. लिसने रेपिस्टला माफ केलं होतं. ती म्हणते की, एक वाईट भूतकाळ विसरून पुढे जाण्याची गरज आहे. ती आता तिच्याप्रमाणे लैंगिक अत्याचाराच्या शिकार झालेल्या महिलांची मदत करणार आहे. 3 / 8लिसने CTVNews.ca सोबत टेलिफोनीक इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की, 'मला आतापर्यंत ४० महिलांसोबत काम करण्याची संधी मिळाली. महिलांसोबत हिंसेनंतर उपचार करणे, अवघडलेपण दूर करणे, शरीरावर प्रेम करणे अशा वेगवेगळ्या गोष्टींवर काम करते. तिच्या अनुभवाबाबत सांगताना ती म्हणाली की, कोर्टातील प्रक्रिया ही अत्याचारा इतकीच वेदनादायी असते, जी तुम्ही वेदनेतून बाहेर पडू देत नाही. 4 / 8लिसला हे जाणून घ्यायचं आहे की, अखेर रेपिस्टने त्यांच्यासोबत असं का केलं. लिस म्हणते की, जर तिला रेस्टोरेटिव जस्टिस प्रोसेसबाबत आधीच माहीत असतं तर तिने स्वत:ला कोर्टाच्या कार्यवाहीतून होणाऱ्या त्रासातून स्वत:ला वाचवलं असतं. तिने सांगितले की, रेस्टोरेटिव जस्टिस प्रोसेसला एक मेडिटेशन सर्कल म्हणून आयोजित करण्यात आलं होतं. यात पीडितेची आई, बहीण, तिची एक मैत्रीण, दोन मेडिटेटर्स, दोन वकिल आणि स्वत: रेपिस्ट होता. इथे तिने सर्वांसमोर ८ तास आपल्या वेदना सांगितल्या आणि सांगितले की, या घटनेने कशाप्रकारे तिच्या जीवनावर वाईट प्रभाव पडला.5 / 8कॅनडाच्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिसनुसार, रेस्टोरेटिव जस्टिस प्रोसेस गुन्ह्यातून होणाऱ्या नुकसानाच्या भरपाईच्या आधारित आहे. या प्रक्रियेत गुन्ह्यानंतर पीडित पक्षाच्या गरजांची माहिती घेऊन भरपाई करण्याचा प्रयत्न केला जातो. लिस म्हणते की, ती तिच्या संस्थेतून महिलांना हिंसेचा शिकार झाल्यावर स्वत:च्या शरीरावर प्रेम करायला शिकवते. ती वेगवेगळ्या वर्कशॉपच्या माध्यमातून करते.6 / 8या कार्यक्रमांच्या माध्यमातून लिस हिंसेनंतर दु:खं आणि लाजेला स्वत:वर हावी होऊ न देण्याची कला शिकवतात. आपल्यासोबत झालेल्या हिंसेनंतर लिसला लाज आणि दुखापासून वाचण्यासाठी हे शिकावं लागलं होतं. 7 / 8स्टॅटिस्टिक्स कॅनडा सर्व्हे १८ नुसार, १५ वर्षाच्या १ कोटी १० लाखापेंक्षा अधिक मुली शारीरिक अत्याचाराच्या किंवा लैंगिक हिंसाचाराच्या शिकार झाल्या. स्टॅटकॅनच्या एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, लैंगिक हिंसेच्या प्रत्येक पीडितांमध्ये महिला आणि पुरूष दोघेही असतात. यातील बहुतेक घटनांची सूचना पोलिसांना दिली जात नाही.8 / 8लिसची इच्छा आहे की, प्रत्येक पीडितेला हे माहीत असलं पाहिजे की, कारवाई दरम्यान त्यांच्याकडे 'क्रिमिनल जस्टिस सिस्टीम' हा एकमेवल पर्याय नाही. लिस सांगते की, लैंगिक पीडितांना त्यांच्या पर्यायांबाबत सांगितलं गेलं पाहिजे. रेस्टोरेटिव जस्टिस प्रोसेस सर्वांसाठी नाहीये. पण न्याय प्रणालीच्या आत काम करणाऱ्यांना शिक्षित करण्यासाठी ती अधिक सुलभ केली जाऊ शकते. आणखी वाचा Subscribe to Notifications