शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एका लग्नाची गोष्ट! 48 तासात दोनदा झालं महिलेचं लग्न, आधी भाच्यासोबत मग पतीसोबत...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2022 1:24 PM

1 / 5
अजब नात्यांच्या, प्रेमाच्या वेगवेगळ्या हैराण करणाऱ्या घटना नेहमीच समोर येत असतात. पण बिहारमधून एका लग्नाची एक अशी घटना समोर आली आहे ज्याबाबत वाचून लोक हैराण झाले. लग्नाच्या 12 वर्षानंतर मामी भाच्याच्या प्रेमात पडली. महिलेचा पती कामानिमित्ताने नेहमीच घराबाहेर राहत होता. अशात भाचा मामीच्या घरी येत-जात होता. एक दिवस पतीने दोघांना रंगेहाथ पकडलं. राग व्यक्त करण्याऐवजी त्याने आपल्या प्रेमाचा बळी देत दोघांचं लग्न लावून दिलं. आनंदाने दोघांना सार केलं. पण झालं असं की, भाच्याचं प्रेम 24 तासही टिकू शकलं नाही. तो आपल्या मामीला सोडून फरार झाला. मग महिला पुन्हा आपल्या पतीकडे आली. पतीनेही तिची चुकी माफ करत तिच्यासोबत पुन्हा लग्न केलं.
2 / 5
ही घटना बिहारच्या झिकटिया गावातील आहे. इथे एका व्यक्तीच्या दिलदारपणाने लोकांची मनं जिंकली आहेत. बबलू शर्माचं लग्न 12 वर्षाआधी सुनीतासोबत झालं होतं. सुनीताची भेट एका लग्नात चुलत भाचा संतोषसोबत झाली होती. संतोष हा मलपा गावात राहणारा होता. दोघांची मैत्री प्रेमात बदलली. मिस्त्री असल्याने महिलेचा पती नेहमीच कामासाठी बाहेर राहत होता. भाचा संतोष मामा घरी नसताना त्याच्या घरी येऊ लागला होता. बबलूला याची माहिती मिळाली होती. एक दिवस त्याने दोघांना आक्षेपार्ह स्थितीत पकडलं. गावातील लोक जमा झाले. बबलूने सगळ्यांसमोर पत्नीचं लग्न भाच्यासोबत लावून दिलं.
3 / 5
गावात सगळीकडे हीच चर्चा रंगली होती. लोकांच्या समोरच संतोषने आपल्या मामीच्या भांगेत कुंकू भरलं. सुनीताच्या घरचे लोकही या लग्नाला उपस्थित होते. इतकंच नाही तर एक करार पत्र सुद्धा तयार करण्यात आलं. ज्यात सुनीताने लिहिलं की, ती तिच्या पतीला इच्छेने सोडत आहे आणि आपला प्रियकर संतोष कुमारसोबत राहणार आहे. ती तिच्या पतीसोबत कोणताही संबंध ठेवणार नाही. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झालाय.
4 / 5
पण झालं असं की, संतोष आणि सुनीताचं लग्न 48 तासही टिकू शकलं नाही. या प्रेम कहाणीत एक ट्विस्ट आला. संतोष जसा आपल्या मामीला लग्न करून घरी घेऊन गेला तेव्हा त्याच्या परिवाराने तिला स्वीकारण्यास नकार दिला. हे नातं त्यांना मान्य नव्हतं. घरातील लोकांचा विरोध बघून संतोषचं प्रेमाचं भूत डोक्यातून उतरलं. इतकंच नाही तर पत्नी सुनीताला सोडून तो फरार झाला.
5 / 5
संतोष अचानक फरार झाल्याने सुनीता तिची चूक लक्षात आली. तिला तिचं पहिलं प्रेम आठवलं. हिंमत करून ती तिच्या पहिल्या पतीकडे गेली. आधीतर बबलूने तिला सोबत ठेवण्यास नकार दिला होता. पण लोकांनी त्याला समजावलं. सुनीताची स्थिती पाहून तो तिला सोबत ठेवण्यास तयार झाला. पुन्हा एकदा सुनीताने लग्न केलं. पतीने तिच्या भांगेत कुंकू भरलं आणि तिला आपली जोडीदार म्हणून स्वीकारलं.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेBiharबिहारmarriageलग्न