शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मंगळवार उगवले टॉमेटो आणि त्याचा बनवला केचअप? कसा तयार झाला 'मंगळावरचा केचअप'...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2021 6:47 PM

1 / 10
पृथ्वीवरच्या मातीच्या उलट, मंगळाची माती पिकांसाठी कठोर आहे. मंगळ ग्रहावरची माती मार्टियन रेगोलिथ म्हणून ओळखली जाते.
2 / 10
त्या मातीत सेंद्रिय पदार्था नसतात. याशिवाय मंगळावर सूर्यप्रकाशही कमी पोहोचतो.
3 / 10
यामुळे, टोमॅटो पिकवणाऱ्या टीमने ते वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान शोधून त्याचा वापर केला आणि त्यांना यश आलं.
4 / 10
मानवाने मंगळावर राहण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हे केले गेले आहे.
5 / 10
एक दिवस माणसानी मंगळावर स्वतः शेती करावी या दिशेने काम करणाऱ्या टीमने मंगळ ग्रहासारखे हरितगृह वातावरण तयार केले आणि मंगळासारखीच माती वापरली.
6 / 10
त्यांनी या पद्धतीने टोमॅटो उगवले आणि नंतर हेन्झने त्या टोमॅटोंचे केचअप तयार केले.
7 / 10
हेन्झने तयार केलेल्या ‘मार्स एडिशन’ टोमॅटो केचपची चव साधारण टोमॅटो केचपपेक्षा वेगळी असल्याचे त्यात म्हटले आहे.
8 / 10
हेन्झने मार्स व्हर्जन केचपची बाटलीही अंतराळातपण पाठवली होती, जिथे ही बाटली -94 अंश तापमानात होती.
9 / 10
हेन्झमधील टोमॅटो मास्टर्सने मंगळावर भविष्यात जाणारे लोक त्या ग्रहाच्या मातीत टोमॅटो पिकवू शकतील का, त्याचं केचप बनवू शकतील की नाही हे शोधण्यासाठी मोहीम सुरू केली.
10 / 10
त्यासाठी उत्तम बियाणे घेण्यात आले आणि जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांची वाढ करण्यात आली.
टॅग्स :Jara hatkeजरा हटके