शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भिकेला लागलेल्या पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत माणसाची मुलगी, जिने १२३ कोटी असे सहज दान केले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 5:02 PM

1 / 6
शन्ना खान ही दानशूर आहे आणि इलिनॉय विद्यापीठाच्या पशुवैद्यकीय शिक्षण रुग्णालयाला १२३ कोटी रुपये देणगी देऊन ती चर्चेत आली आहे. शन्ना खान तिचे वडील शाहिद खान यांचा व्यवसायही सांभाळते. शाहिद खानने स्पोर्ट्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे आणि त्यांना स्पोर्ट्स टायकून देखील म्हटले जाते. ते त्यांच्या लक्झरी जीवनशैली आणि शाही राहणीसाठी ओळखले जातात.
2 / 6
शाहिद खान यांची एकूण संपत्ती ९७,२७६ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यांची मुलगी शन्नाची संपत्तीही लाखो डॉलर्समध्ये आहे. शाहिद खान नॅशनल फुटबॉल लीग (NFL) मध्ये जॅक्सनव्हिल जॅग्वार्स आणि प्रीमियर लीगमध्ये फुलहॅम एफसी संघाचे मालक आहेत.
3 / 6
शाहिद यांचा मुलगा टोनी खान त्यांच्या क्रीडा व्यावसाय सांभाळतो आणि तो त्याच्या वडिलांसोबत ऑल एलिट रेसलिंग (AEW) चा मालक आहे.
4 / 6
शन्ना सहसा प्रसिद्धीपासून दूर राहते. पण, तिच्या दानशूरपणामुळे आणि सुंदरतेमुळे ती चर्चेत येते. ती जॅग्वार्स फाउंडेशनच्या माध्यमातून समाजसेवा करते. पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिलांमध्ये तिची गणना होते.
5 / 6
रिपोर्ट्सनुसार, शन्ना खानची एकूण संपत्ती २० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त आहे. ३७ वर्षांच्या शन्नाचा जन्म भलेही अमेरिकेत झाला असेल पण ती अमेरिकेसोबतच पाकिस्तानातही व्यवसाय करते. शन्नाचा जन्म आणि शिक्षण अमेरिकेतील इलिनॉय येथे झाला.
6 / 6
एक परोपकारी, व्यापारी आणि काँग्रेस प्रतिनिधी म्हणून त्यांनी आपली वाटचाल केली आहे. काँग्रेसच्या जिल्हा सहाय्यकाच्या भूमिकेव्यतिरिक्त, शन्ना युनायटेड मार्केटिंग कंपनीची सह-मालक आहे. ही कंपनी एक विशेष पॅकेजिंग डिझाइन संस्था आहे.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेPakistanपाकिस्तान