शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

डोनाल्ड ट्रम्प इतकीच पॉवरफुल आहे त्यांची 'द बीस्ट' कार, खासियत वाचून म्हणाल कार आहे की टॅंक?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 3:01 PM

1 / 9
जगातल्या सर्वात शक्तीशाली देशाचे म्हणजेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे २४ आणि २५ फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येत आहेत. त्याबाबत सगळीकडे काहीना काही चर्चा रंगली आहे. डोनाल्ड ट्रम्प येण्याआधीच त्यांचा गाड्यांचा ताफा आग्र्यात पोहोचला आहे. अशात त्यांच्या खास कारची चर्चा होणार नाही तर नवल...त्यांची 'द बीस्ट' नावाच्या कारबाबत आम्ही तुम्हाला काही आश्चर्यकारक गोष्टी सांगणार आहोत. (Image Credit : reddit.com)
2 / 9
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्यासाठी खासकरून डिझाइन करण्यात आलेली द बीस्ट कार ही एक शस्त्रांनी सज्ज चालता फिरता रणगाडाच आहे. ही कार आर्म्ड लिमोसीन आहे. या कारचा २४ सप्टेंबर २०१८ मध्ये ताफ्यात समावेश करण्यात आला होता. असे मानले जाते की, द बीस्ट ही कार डील इंजिनवर चालते. कारण यात मोठ्या आकाराचे रेक्टॅंग्युलर फ्यूल फिलर डोर लावलेले आहे.
3 / 9
ट्रम्प यांच्या या गाडीची किंमत १० कोटी रूपये असल्याचं सांगितलं जातं आणि ही कार जनरन मोटर्सने तयार केली आहे. या कारची खासियत म्हणजे यात ८ हजार सीसीचं इंजिन लावण्यात आलंय. जे ८०० बीएचपी पॉवर देतं. तर सुरक्षेच्या बाबतीत ही कार कोणत्याही टॅंकपेक्षा कमी नाही.
4 / 9
या कारचे दरवाजे आठ इंच जाड आणि बोइंग ७४७ विमानाच्या कॅबिनच्या दरवाज्या इतके जड आहेत. या कारची बॉडी तयार करण्यासाठी स्टील, टायटेनिअम, अॅल्यूनिअम आणि सिरेमिकचा वापर करण्यात आलाय. ही कार इतकी सुरक्षित आहे की, आगीतूनही सहज निघू शकते.
5 / 9
माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या कार्यकाळात या कारला द बीस्ट नाव देण्यात आलं होतं. द बीस्ट ही कार ट्रकच्या चेसिसवर तयार करण्यात आली आहे. कारचा खालचा भाग सुरक्षित करण्यासाठी चेसिसखाली पाच इंचाची स्टील प्लेट लावली आहे. जेणेकरून लॅंडमाइन बॉम्ब ब्लास्टपासून सुरक्षा व्हावी. या कारच्या वजनावरून अंदाज लावला जाऊ शकतो की, ही कार आणण्यासाठी मालवाहक विमान सी १७ ग्लोबमास्टरचा वापर करावा लागतो.
6 / 9
तसेच या कारच्या खिडक्यांना लावलेली काच पॉली कार्बोनेटच्या पाच लेअर्सपासून तयार केली आहे. याने ती बुलेटप्रूफ होते. केवळ ड्रायव्हर साइडच्या खिडकीचेच काच तीन इंच खाली करता येऊ शकतात. तसेच या कारच्या ड्रायव्हरचा संपर्क थेट ट्रेकिंग सेंटरसोबत असतो. ड्रायव्हरसाठी वेगळं कॅबिन असतं. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष काय करतात हे तो बघू शकत नाही.
7 / 9
ही कार चालवण्याची जबाबदारी केवळ सिक्रेट सर्व्हिसच्या कमांडो ड्रायव्हरकडे असते. गरज पडली तर ही कार १८० च्या वेगानेही चालवू शकतो. असे मानले जाते की, कॅडिलॅक कारच्या १२ कॉपी आहेत. राष्ट्राध्यक्षांच्या सीटजवळ एक सॅटेलाइट फोन असतो. ते याने पेंटागॉन आणि उप-राष्ट्राध्यक्षांसोबत बोलू शकतात.
8 / 9
या खास कारमध्ये नाइट व्हिजन कॅमेरे लावण्यात आले आहेत. सोबतच कारमध्ये सुरक्षेसाठी पंप अॅक्शन शॉटगन, अश्रू धुराचे बॉम्ब, राष्ट्राध्यक्षांच्या रक्तगटाशी मिळणारं Rh-negative रक्तही यात असतं. तसेच यात ऑक्सिजनची व्यवस्थाही असते. (Image Credit : thesun.co.uk)
9 / 9
द बीस्टमध्ये कॅवेलरी रीइनफोर्स्ड, स्टील रिम्स असलेले टायर देण्यात आले आहेत. जे कधीच पंचर होत नाहीत. तसेच टायर फुटला तरी कारच्या वेगावर काही प्रभाव होत नाही. या कारचं वजन ६४०० किलो ग्रॅम इतकं आहे. यात सात लोक बसू शकतात. तसेच ही कार एक गॅलन म्हणजे ३.५ लीटर तेलात ८ किमी मायलेज देते. तर या कारची टॉप स्पीड १०० किमी प्रति तास आहे.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पcarकारAmericaअमेरिकाIndiaभारतInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स