Meteorite crashes in australian school playground nasa probes at science
शाळेच्या मैदानात पडलं मोठं उल्कापिंड; तपासणीनंतर नासाच्या वैज्ञानिकांना कळलं असं काही... By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2021 4:35 PM1 / 6ऑस्ट्रेलियाच्या उत्तर क्वीसलँडमधील एका प्राथमिक शाळेच्या मैदानावर आकाशातून एक उल्कापिं येऊन पडलं. आजूबाजूच्या परिसरात ही घटना वाऱ्यासारखी पसरली. मैदानात उल्कापिंड पडल्यामुळे त्या ठिकाणचे गवत संपूर्ण जळून गेले होते. एका मोठा खड्डा या ठिकाणी तयार झाला होता. जेव्हा याबाबत खुलासा झाला तेव्हा सर्वचजण चकीत झाले.2 / 6उत्तर क्वीसलँडमधील मालंडा स्टेट शाळेचे मुख्याध्यापक मार्क एलेन यांनी सांगितले की या घटनेबाबत सर्वच स्तरातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ऑस्ट्रेलियात उल्कापिंड पडल्याची बातमी ऐकल्यानंतर अमेरिकन अंतराळ संस्था नासानं या शाळेची तपासणी सुरू केली. त्या ठिकाणी सामान्य लोकांना येण्यासाठी बंदी घालण्यात आली होती.3 / 6डेलीमेलनं दिलेल्या माहितीनुसार जेव्हा नासाच्या वैज्ञानिकांनी शाळेचे प्राध्यापक आणि शिक्षकांची विचारपूस केली तेव्हा ते चकीत झाले. मार्क एलेन यांनी वैज्ञानिकांना सांगितले की, हा कोणताही अंतराळातून आलेला उल्कापिंड नसून मुलांच्या असाईंनमेंटचा एक भाग आहे. शाळेतील मुलांना उल्कापिंडाबाबत माहिती देण्यासाठी असं करण्यात आलं होतं.4 / 6मार्क एलेन यांनी सांगितले की, ''उल्कापिंडाचा रिपोर्ट तयार करण्यास सांगण्यात आलं होतं. याशिवाय पोलिस आणि प्रशासनाच्या सर्तकतेबाबतही अनेक गोष्टी या रिपोर्टमध्ये नमुद करायच्या होत्या. म्हणून आम्ही मैदानात उल्कापिंड बनवलं. कोळश्यापासून तयार झालेला हा एक गरम गोळा आहे.''5 / 6पोलिस आणि प्रशासनानेही मुलांना मदत केली. उल्कापिंड अंतराळातून शाळेत पडेल याप्रमाणे सगळी रचना करण्यात आली होती. या प्रोजेक्टबाबत सोशल मीडियावरील पोस्टमध्ये उल्कापिंड पडल्याचे सांगण्यात आले. 6 / 6सोशल मीडियावरील फोटो पाहिल्यानंतर नासातील वैज्ञानिक नाराज आणि चकीत झाले होते. कारण लहान मुलांचा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी केलेला प्रयोग संपूर्ण जगाला खरोखरचं उल्कापिंड पडल्याप्रमाणे वाटू शकतो. आणखी वाचा Subscribe to Notifications