शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'चमत्कार'! भूकंपानंतर जड हृदयाने मुलीचा मृतहेद शोधत होता वडील, ९१ तासांनंतरही जिवंत आढळून आली चिमुकली

By अमित इंगोले | Published: November 04, 2020 2:39 PM

1 / 9
भूकंपाची तीव्रता ७ रिश्टर स्केल इतकी असल्याचे सांगितले. तसेच या भूकंपात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही १०० च्या वर गेली आहे. अशात तुर्कीच्या इजमिर शहरात मलब्याखाली एक 'चमत्कार'ही बघायला मिळाला. इथे रेस्क्यू टीमने ९१ तासांनंतर म्हणजे चार दिवसांनंतर एका चार वर्षांच्या मुलीला वाचवलं. चार दिवस ही चिमुकली पाणी आणि जेवणाविना जीवनाशी लढा देत राहिली. या मुलीला अशा स्थितीत जिंवत पाहून सगळेच हैराण झाले. तिच्या वडिलांनी तिला जिवंत बघताच तिला जवळ घेतले. त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. या रेस्क्यू ऑपरेशनचे फोटो व्हायरल झाले आहेत.
2 / 9
४ वर्षांची एडा गजगीनला तुर्कीच्या कोस्टल सिटी इजमिरमध्ये जीवघेण्या भूकंपाच्या चार दिवसांनंतर वाचवण्यात आले आहे. भूकंप ग्रीस आणि तुर्कीला आपला निशाणा बनवून गेला. कुणालाही अपेक्षा नव्हती की, भूकंपाच्या चार दिवसांनंतरही कुणी जिवंत असेल.
3 / 9
एडाला लगेच अॅम्बुलन्सने हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. आधी तिला थर्मल ब्लॅंकेटमध्ये गुंडाळण्यात आलं. तिला जिवंत असल्याचे पाहून लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि देवाचे आभार मानले.
4 / 9
तुर्कीला ७ मॅग्नीट्यूडच्या भूकंपाने शुक्रवारी सायंकाळी धक्का दिला. या भूकंपाच्या ९१ तासांनंतर एडाला मलब्यातून बाहेर सुरक्षित काढण्यात आलंय.
5 / 9
या भूकंपात आतापर्यंत १०२ लोकांचा जीव गेला आहे. अजूनही मलब्याखाली दबून असलेल्या मृतदेहांची शोध घेतला जात आहे.एडाचा आवाज मलब्याखालून ऐकू आला होता. त्यानंतर एकच धावपळ झाली. सगळ्यांनी लवकरात लवकर रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं.
6 / 9
जेव्हा मुलीला काढण्याची तयारी सुरू होती तेव्हा तिचे वडील तिथेच उभे होते. ते तिथे श्वास रोखून मुलीला जिवंत बघण्यासाठी आस लावून उभे होते. जसे एडाला बाहेर काढण्यात आले तेव्हा तिच्या वडिलांनी लगेच तिला जवळ घेतले. हा कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही. एका ४ वर्षाच्या मुलीने ९१ तास मलब्याखाली घालवले आणि मृत्यूला मात दिली.
7 / 9

8 / 9

9 / 9

टॅग्स :EarthquakeभूकंपInternationalआंतरराष्ट्रीयSocial Viralसोशल व्हायरल