शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Miracle puppy : पहिल्यांच समोर आला ६ पाय अन् २ शेपट्यांचा कुत्रा; अशा अवस्थेत जीवंत राहणारा जगातला पहिला जीव

By manali.bagul | Published: February 25, 2021 5:57 PM

1 / 7
अनेकदा तुम्ही पाहिलं असेल कोणताही जीव किंवा जंतू दोन डोकी घेऊन जन्माला येऊ शकतो. त्याला कोणतेही पाय किंवा डोळे नसतात. पण असे जीव जास्त दिवस जीवंत राहू शकत नाहीत. अमेरिकेतील रहिवासी असलेला ओक्लाहोमा असाच एका जीव आहे
2 / 7
या प्राण्याला सहा पाय आणि दोन शेपट्या आहेत. दोन पेल्विक रिजन्स असून दोन प्रजनन संस्था आहेत. विशेष म्हणजे या प्राण्याचे सर्व अवयव व्यवस्थित काम करत आहेत. अमेरिकेतील डॉक्टरांनी ही चमत्कारीक घटना असल्याचे सांगितले आहे.
3 / 7
या कुत्र्याचे नाव स्किपर आहे. हा बॉर्डर कोली आणि ऑस्ट्रेलियान शेफर्डचा ब्रीडच्या कुत्र्यांचा क्रॉस आहे. स्किपरसह ८ बहिण भाऊ सुद्धा जन्माला आले होते. १६ फेब्रुवारीला ही घटना समोर आली.
4 / 7
ओक्लाहोमा बाबत नील वेटरिनरी रुग्णालयातील डॉक्टर टीना नील यांनी सांगितले की, जेव्हा हा पपी जन्माला आला तेव्हा बर्फाचं वादळ आलं होतं. बर्फाचा या कुत्र्याच्या आरोग्यावर परिणाम झाला असावा म्हणून या कुत्र्याचा मालक त्याला रुग्णालयात घेऊन आला, जेणेकरून बर्फामुळे कुत्र्याला कोणत्याही त्रासाचा सामना करावा लागणार नाही.
5 / 7
डॉ. टिना नील यांनी सांगितले की, सध्या हा कुत्रा जीवंत असून त्याचे सर्व अवयव व्यवस्थित काम करत आहेत.
6 / 7
आतापर्यंत असा कोणताही कुत्रा जन्माला येऊन जास्त दिवस जीवंत राहिलेला नाही. त्यामुळे या कुत्र्याचं जीवंत राहणं खूप मोठा चमत्कार समजला जात आहे.
7 / 7
स्किपर एक मादी आहे आणि त्याला कोजेनाईटल कोज्वाइनिंड डिर्साडरचा सामना करावा लागत आहे. ज्याला मोनोसिफेलस डाइपिगर आणि मनोसिफेलस रॅचिपॅगस डायब्रेचियस टेट्रापस असं म्हणतात. या कुत्र्याला सामान्य कुत्र्यापेक्षा जास्त अवयव आहेत.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलdogकुत्रा