By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2021 15:31 IST
1 / 9गुजरातमधून एका हृदयद्रावक घटना समोर आली आहे. इथे एका आईला तिच्या मुलाच्या मृत्यूनंतर जवळपास १ वर्षाने त्याची सुसाइड नोट सापडली आहे. 2 / 9सुसाइड नोटमध्ये त्याने ते कारण सांगितलं ज्यामुळे त्याने इतकं मोठं पाउल उचललं. घटना एप्रिल २०२० मधील आहे. 3 / 9तर मुलाने सुसाइड नोट एप्रिल २०१९ मध्ये लिहिलं होतं. आईला हे लेटर जानेवारी २०२१ मध्ये सापडलं. टाइम्स ऑफ इंडियानुसार, सुसाइड नोट मिळाल्यानंतर महिला पोलिसांकडे गेली. तिने तक्रार दाखल केली. 4 / 9लीला जाधवचा मुलगा माधवने गेल्यावर्षी ९ एप्रिलला नर्मदा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. 5 / 9एक दिवसांनंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. आईला हे माहीत नव्हतं की, त्याने त्याचं जीवन असं अचानक का संपवलं. आता त्याच्या या सुसाइड नोटमधून त्या कारणाचा खुलासा झाला आहे. 6 / 9नोटमध्ये माधवने लिहिले की, तो त्याचं जीवन संपवत आहे कारण त्याच्या नपुंसकतेमुळे त्याच्या पत्नीने तिच्या प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवले होते. 7 / 9या नोटनुसार, माधव हा लग्नाआधीपासून नपुंसक होता. इतकेच काय तर त्याच्या पत्नीने देखील त्याला नपुंसक म्हणायला सुरूवात केली होती. 8 / 9त्याने हाही आरोप केला की, त्याच्या पत्नीने त्याच्यासमोरच प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवले. हे एकदा नाही तर अनेकदा झालं होतं.9 / 9पत्रात त्याने लिहिले की, 'मी त्यांना त्यांचं हे नातं संपवण्यास सांगितलं होतं. कारण यामुळे त्रास होत होता. पण त्यांनी माझा अपमान करणं सुरूच ठेवलं. त्यांनी हे थांबवण्यास नकार दिला आहे. मी आत्महत्या करेल'.