शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जनावरांवर कोर्टात खटला आणि फाशी, जाणून घ्या रोचक इतिहास!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 2:57 PM

1 / 7
आतापर्यंत तुम्ही हेच वाचलं किंवा ऐकलं असेल की, एका व्यक्तीवर खटला चालला किंवा त्याला शिक्षा म्हणून फाशी देण्यात आली. १९०६ मध्ये लंडनच्या डब्ल्यू हेनमन प्रकाशनाने एक पुस्तक प्रकाशित केलं होतं. The Criminal Prosecution and Capital Punishment of Animals असं या पुस्तकाचं नाव होतं. या पुस्तकात त्या घटनांचा उल्लेख आहे ज्यात काही जनावरांवर खटला चालवला गेला. इतकेच नाही तर काही प्रकरणांमध्ये त्यांना फाशीही देण्यात आली. चला जाणून घेऊ अशाच काही आश्चर्यकारक घटनांबाबत...
2 / 7
१३८६ मध्ये एका नवजात बाळाची हत्या केल्याप्रकरणी एका डुकराला दोषी ठरवण्यात आलं आणि फाशीची शिक्षाही देण्यात आली होती. फाशी देण्यापूर्वी त्याला माणसाप्रमाणे तोंडावर कपडाही टाकण्यात आला होता. त्याचा चेहरा मास्कने झाकण्यात आला होता. त्यानंतर १४ जून १४९४ मध्ये फ्रान्समध्ये एका डुकराची अटक करण्यात आली. त्याच्यावर आरोप होता की, पाळण्यात खेळत असलेल्या बाळावर त्याने हल्ला केला. त्या लहान मुलाचा चेहरा आणि मान खाऊन त्याचा चेहरा विद्रुप केला. हे प्रकरण कोर्टात गेलं. याप्रकरणी कोर्टाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली.
3 / 7
१३१४ मध्ये एका बैलाने रस्त्याने जात असलेल्या व्यक्तीवर हल्ला केला. या हल्ल्यात तो व्यक्ती फार गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्या बैलावर खटला चालला आणि नंतर त्याला फाशी देण्यात आली.
4 / 7
१४७४ मध्ये एका कोंबड्यावर अंड देण्याचा खटला चालवला गेला होता. स्वित्झर्लंडमधील एका कोर्टाने त्याला जिवंत जाळण्याची शिक्षा दिली होती.
5 / 7
१६व्या शतकात फ्रान्समध्ये उंदरांवर जवाचे शेत नष्ट करण्याचा आरोप लावण्यात आला होता. उंदरांविरोधात कोर्टात खटला चालवला गेला.
6 / 7
सप्टेंबर १९१६ मध्ये अमेरिकेच्या टेनेसी राज्यात एका हत्तीला फाशी देण्यात आली होती. हत्तीचं नाव मेरी होतं. त्याने एका सर्कस दरम्यान आपल्या एका ट्रेनरची हत्या केली होती. ट्रेनरची हत्या केल्याप्रकरणी त्या हत्तीला फाशीची शिक्षा देण्यात आली होती.(Image Credit : Daily Mail)
7 / 7
१७१३ मध्ये ब्राझीलमध्ये वाळवीं विरोधात खटला चालवला गेला होता. वाळवींवर चर्चची संपत्ती नष्ट केल्याप्रकरणी खटला चालवण्यात आला होता.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल