शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

माणसांना दारू का आवडते?; नशेत टुन्न राहणाऱ्या माकडांवर संशोधन करून शोधणार कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2022 5:48 PM

1 / 11
पनामामध्ये(Panama) ब्लॅक हॅन्डेड स्पायडर मंकी नावाची माकडांची एक प्रजाती आहे. हे माकड ताडाचे फळ इतके खातात की दिवसातून अनेक वेळा तुम्हाला तो मद्यधुंद अवस्थेत झोपलेले दिसतील. कारण पाम फ्रुटमध्ये इथेनॉलचं प्रमाण कमी असते. मात्र जास्त फळे खाल्ल्याने ही माकडे नशेत राहतात.
2 / 11
या मद्यधुंद माकडांना पाहून शास्त्रज्ञांच्या मनात विचार आला की, आता असा अभ्यास व्हायला हवा, ज्यातून कळू शकेल की माणसांना दारू इतकी का आवडते? हे माकडच फक्त नशेत राहतात असं नाही. इतर अनेक प्रजातींची माकडे देखील विविध प्रकारची फळे आणि पाने खाल्ल्यानंतर मद्यधुंद असतात. झोपेत राहतात.
3 / 11
शास्त्रज्ञांनी दोन वेगवेगळ्या स्पायडर मंकीच्या लघवीचे नमुने तपासले तेव्हा त्यांच्या नसांमध्ये इथेनॉल वाहत असल्याचा भक्कम पुरावा मिळाला. हे त्यांच्या नसानसात वाहत तर आहेच, पण ते त्याचं पचनही करत आहेत. झोप पूर्ण करण्यासाठी आणि थकवा दूर करण्यासाठी याचा वापर केला जातो. रॉयल सोसायटी ओपन सायन्स या जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे.
4 / 11
नॉर्थरिज येथील कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटीच्या प्राइमॅटोलॉजिस्ट क्रिस्टीना कॅम्पबेल सांगतात की, जंगलात राहणारी माकडे कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवायही नशेची फळे खाऊन नशा करतात हे आम्ही पहिल्यांदाच सिद्ध केले आहे. ते अशी फळे खातात, ज्यात अल्कोहोलचे प्रमाण असते. जास्त फळे खाल्ल्यानंतर नशा करत झोपत राहतात.
5 / 11
क्रिस्टीना म्हणते की, ड्रंकन मंकी हायपोथिसिस बरोबर आहे हे पाहिल्यावर दिसून येते. कॅलिफोर्निया बर्कले विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ रॉबर्ट डडले यांनी २००० मध्ये हा अभ्यास मांडला होता. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की माकडांमध्ये इथेनॉलचा वास घेण्याची आणि चव घेण्याची उत्तम क्षमता असते.
6 / 11
माकडे अशा फळांच्या शोधात असतात, जी पिकलेली किंवा पिकत आहेत. हा एक प्रकारचा उत्क्रांतीचा फायदा आहे. जे इतर कोणत्याही जीवात नाही. याच कारणामुळे मानवांना इथेनॉल म्हणजेच अल्कोहोल पसंत आहे. पण आम्ही संपूर्ण फळांच्या पोषक तत्वांकडे लक्ष दिले नाही ही आमची अडचण आहे. आपण फक्त त्यातून स्पिरीट काढायला शिकलो. माकडे हे करत नाहीत. संपूर्ण फळ मूळ स्वरूपात ठेवून ते खातात. त्यातून मिळणाऱ्या नशेचा आनंद घेतात.
7 / 11
हे फक्त स्पायडर मंकीच करत नाहीत. माकडांच्या इतर प्रजाती देखील हे करतात. जंगली चिंपांझी पामच्या झाडांचे आंबवलेले रस पितानाही दिसले आहेत. झाडांच्या रसाची तपासणी केली असता त्यात ७ टक्के अल्कोहोल असल्याचे आढळून आले, परंतु चिंपांझी इथेनॉलमुळे पाम फ्रूट खात आहेत की खरोखरच नशेसाठी जातात हे स्पष्ट झाले नाही.
8 / 11
क्रिस्टीना आणि तिच्या टीमने पनामामध्ये हा अभ्यास केला आहे. जेणेकरून माकडांनी खाल्लेल्या अल्कोहोलयुक्त फळांचा काय परिणाम होतो हे कळू शकेल. माकडे ही फळे का खातात? सुरुवातीला, स्पायडर मंकीने पिकलेल्या फळांमधून येणा-या इथेनॉलच्या सुगंधापासून स्वतःला दूर ठेवले. पण त्याला उघड्यावर म्हणजेच जंगलात सोडल्यावर तो स्वतः जाऊन तेच पाम फ्रूट खाऊ लागले.
9 / 11
ही फळे खाल्ल्याने स्पायडर मंकींना फक्त नशाच होते असं नाही तर ते त्यांची पचनसंस्था निरोगी ठेवण्याचे कामही करतात. पहिल्यांदाच असा अभ्यास करण्यात आला आहे, ज्यातून माकडांची नशा करण्याची सवय उघड झाली आहे. या आधारे दारूबाबत माणसांच्या आवडीचाही खुलासा होईल.
10 / 11
क्रिस्टीना सांगते की, माकडे कॅलरीजसाठी इथेनॉलयुक्त फळे खातात. त्यांना आंबलेल्या फळांपेक्षा जास्त कॅलरीज मिळतात. अधिक कॅलरी म्हणजे अधिक शक्ती आणि अधिक ऊर्जा. ज्याची त्यांना सर्वात जास्त गरज आहे. अशीच सवय माणसांमध्येही असू शकते. मध्य आणि दक्षिण अमेरिकेत या पाम फळाचा वापर तेथील आदिवासी आणि स्थानिक लोक करतात. त्यातून ते चिचा बनवतात. जी आंबलेली देशी दारू आहे. जी खूप प्रसिद्ध आहे.
11 / 11
आपण जितकी जास्त फर्मेटेंड फळे खाऊ तितकी जास्त ऊर्जा मिळेल. असेही होऊ शकते की आपण खूप नशेत राहू. स्पायडर मंकीच्या बाबतीत, रॉबर्ट डडले यांनी खाल्लेल्या अर्ध्या फळांची तपासणी केली. तेव्हा त्यात जवळपास २ टक्के दारू असल्याचे आढळून आले. परंतु हे अनेक मानसिक फायदे आहेत, त्यांना अँटी-मायक्रोबियल फायदे देखील आहेत. माकडांपासून माणसांपर्यंत सर्वांनाच दारू आवडते. म्हणजेच अल्कोहोल आवडणे हे प्राण्यांच्या डीएनएपासून माणसांच्या डीएनएमध्ये विकसित झाले आहे.