More Than 200 Deadly Snakes Found In Farmer's Home in Gorakhpur pnm
उंदराच्या बिळात मुलांनी पाणी टाकलं; पण जे बाहेर आलं ते पाहून संपूर्ण गावात दहशत पसरली! By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 2:45 PM1 / 11उत्तरप्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात काही लहान मुलांनी केलेल्या प्रकारामुळे संपूर्ण गावात दहशत पसरली. गावातील एका मैदानात लहान मुले गोट्या खेळत होती. 2 / 11मुलांचा डाव ऐन रंगात आलेला असताना एका उंदराच्या बिळात खेळत असणारी गोटी पडली. त्यामुळे मुलांनी ही गोटी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. 3 / 11जेव्हा उंदराचे बिळात गावातील मुलांनी पाणी टाकले. पाणी ओतताच मुलांसह संपूर्ण गाव दहशतीखाली आले. कारण त्या बिळातून तब्बल २०० हून अधिक साप बाहेर पडले. 4 / 11बिळातून बाहेर पडणारे साप पाहून मुलांचा गोंधळ उडाला, बाजूला शेतात पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांनाही हे चित्र पाहून मोठा धक्का बसला 5 / 11गोरखपूरमधील खोराबार पोलिस स्टेशन परिसरातील आराजी बसडीला गावात २०० हून अधिक साप मिळाल्याने खळबळ माजली. घाबरून गावकऱ्यांनी सापांना ठार करत दफन केले. यातील बहुतेक साप म्हणजे कैरेट साप आहेत. याखेरीज येथे धामण आणि कोब्रा देखील होते.6 / 11खेड्यात साप बाहेर आल्याच्या वृत्तानंतर वनविभागाच्या पथकाने अडीच ते तीन फूटांखाली जमिनीखाली दफन केलेल्या सापांना बाहेर काढून परिक्षणसाठी ताब्यात घेतले. 7 / 11मोठ्या संख्येने साप पाहून गावकरी घाबरले. लोक थोड्या वेळात जमा झाले आणि त्यांनी सर्व सापांना ठार मारले. गावात राजमंगलच्या शेतात एक जुने घर असून ते बंद आहे त्यातून हे साप बाहेर पडल्याचं सांगण्यात येत आहे. 8 / 11गावचे प्रमुख सुरेंद्र मोहन यांनी सांगितले की, मुले तिथे खेळत होते. तेथे उंदरांचे एक बिळ सापडले ज्यामध्ये त्या मुलांच्या खेळण्यातील गोटी गेली होती. गोटी काढण्यासाठी मुलांनी त्या बिळात पाणी टाकले. त्यानंतर, एक एक करून लहान साप बाहेर येऊ लागले आणि गावकऱ्यांच्या घराच्या दिशेने येऊ लागले. 9 / 11सुरक्षेच्या कारणास्तव गावकऱ्यांनी घाबरुन सापांना ठार केले आणि पुरले असं गावचे प्रमुख सुरेद्र मोहन यांनी सांगितले. 10 / 11कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ काढला आणि व्हायरल केला. यानंतर वन विभागाच्या टीमने गावात पोहचून मेलेल्या सापांना ताब्यात घेतले.11 / 11साप मिळाल्याच्या बातमीनंतर तातडीने डीएफओ आशुतोष कुमार हे टीमसह गावात पोहचले. तोपर्यंत गावकऱ्यांनी सापाला मारुन दफन केले होते. त्यानंतर टीमने या सापांना बाहेर काढून लॅबमध्ये पाठवले आहे. या प्रकरणाची तपासणी करुन कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितले. आणखी वाचा Subscribe to Notifications