शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जगातले असे पाच विषारी जीव जे क्षणात व्यक्तीला पाठवू शकतात यमसदनी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 2:57 PM

1 / 6
जगात कितीतरी सुंदर जीव आहेत. त्यांच्या सुंदरतेकडे लोक आकर्षित होता. या जीवांना पाहून असं वाटतं ते दुसऱ्या ग्रहावरून आलेत. पण आज आम्ही तुम्हाला जगातल्या सर्वात धोकादायक आणि विषारी जीवांबाबत सांगणार आहोत. हे जीव इतके विषारी आहेत की, काही क्षणात माणसाचा जीव जाऊ शकतो.
2 / 6
विंचू तर तुम्ही अनेकदा पाहिले असतील. पण हा जगातला सर्वात विषारी विंचू आहे. याला इंडियन रेड स्कॉर्पियन नावाने ओळखलं जातं. कारण हा जास्तकरून भारतात आढळतो. तसेच हा विंचू पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळमध्येही आढळतो. हा विंचू चावला तर माणसाचा ७२ तासात मृत्यू निश्चित आहे.
3 / 6
फनल वेस स्पायडर जास्त ऑस्ट्रेलियामध्ये आढळते. म्हणूनच त्याला ऑस्ट्रेलियन फनल वेब स्पायडर असंही नाव आहे. याचं विष सायनाइडपेक्षाही जास्त घातक आहे. असे म्हणतात की, हा स्पायडर जर कुणाला चावल तर १५ मिनिटांपासून ३ दिवसाच्या आत व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.
4 / 6
कोन स्नेल एक शंख आहे. पण हा जीव फारच घातक आहे. याचं विषही फार घातक आहे. ज्याने व्यक्ती क्षणात पॅरालाइज होऊ होऊ शकतो. तशा तर जीवाच्या जगभरात ६०० पेक्षा जास्त प्रजाती आहेत. मात्र, हा जीव सर्वात विषारी आहे.
5 / 6
ऑक्टोपसबाबत तुम्ही ऐकलं असेलच. जगभरात ऑक्टोपसच्या ३०० पेक्षा जास्त प्रजाती आहेत. पण यातील ब्लू रिंग्ड ऑक्टोपस सर्वात घातक आणि विषारी आहे. असे म्हणतात की, याचं विष व्यक्तीला केवळ ३० सेकंदात मारू शकतं. याच्या केवळ एका थेंबात इतकं विष असतं की, साधारण २५ व्यक्तींचा मृत्यू एकदाच होऊ शकतो. हा ऑक्टोपस हिंद महासागर आणि ऑस्ट्रेलियाच्या समुद्रात आढळतात.
6 / 6
जेलीफिशही दिसायला सुंदर पण तेवढ्याच घातक असतात. यात बॉक्स जेलीफिश तर अधिकच विषारी असते. आतापर्यंत जेवढ्या विषारी जीवांचा शोध घेण्यात आला त्यात सर्वात जास्त विषारी हा जीव आहे. असे म्हणतात की, या जेलिफिशचं विष एकाचवेळी ६० लोकांचा जीव घेऊ शकते.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके