शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जगातील सगळ्यात महागडं नाणं, एका कॉइनमध्ये खरेदी कराल अनेक बंगले आणि कार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 12:04 PM

1 / 8
Most Expensive Coin In The World: जगात असे बरेच लोक आहेत ज्यांना कॉइन कलेक्शनची खूप आवड असते. कधी कधी एक नाणंही तुम्हाला कोट्याधीश बनवू शकतो. जगातलं सगळ्यात महाग नाणं किती रूपयांचं असेल असं विचारलं तर जास्त लोक हजारो किंवा लाखो असं उत्तर देतील.
2 / 8
पण आज आम्ही तुम्हाला एका अशा नाण्याबाबत सांगणार आहोत ज्याच्या किमतीबाबत तुम्ही विचारही केला नसेल. सोबत जगातल्या सहा सगळ्यात महाग नाण्यांबाबतही आम्ही सांगणार आहोत.
3 / 8
1) जगातल्या सगळ्यात महागड्या नाण्याचं नाव Saint-Gaudens Double Eagle आहे. हे नाणं 1907 ते 1933 दरम्यान तयार करण्यात आलं होतं. त्यावेळी अशी केवळ 4,45,500 नाणीच तयार करण्यात आली होती. ही नाणी ऑगस्‍टस सेंट गॉडंसने डिझाइन केलं होतं. आज यातील केवळ 12 नाणीच शिल्लक आहेत. अमेरिकेत झालेल्या एका लिलावात यातील एका नाण्यावर 163 कोटी रूपयांची बोली लावण्यात आली.
4 / 8
2) जगातल्या दुसऱ्या सगळ्यात महागड्या नाण्याचं नाव Flowing Hair Silver Dollar आहे. ही नाणी 1794 मध्ये तयार करण्यात आली होती आणि तेव्हा केवळ 1,758 नाणी बनवण्यात आली होती. सध्या जगात ही केवळ 6 नाणी शिल्लक आहेत. लिलावात यातील एका नाण्याची किंमत 107.57 कोटी रूपये लावण्यात आली होती.
5 / 8
3) जगातील तिसरं सगळ्यात महागडं नाणं Brasher Doubloon आहे. ही नाणी 1787 मध्ये न्‍यूयॉर्कमधील एक सोनार इफ्रेम ब्रेशरने तयार केली होती. हे अमेरिकेत तयार करण्यात आलेलं पहिलं सोन्याचं नाणं होतं. जगात केवळ अशी 7 नाणी आहेत. याच्या एका नाण्याची किंमत 80.89 कोटी रूपये आहे.
6 / 8
4) जगातल्या सगळ्यात महागड्या नाण्यांच्या या यादीत चौथ्या नंबरवर Edward III Florin नाणी आहेत. ही नाणी इंग्लंडचा किंग एडवर्ड तृतीयने तयार केली होती. आपल्या खास डिझाइनमुळे ही नाणी दुर्मीळ मानली जातात. लिलावात यातील एका नाण्याला 55.08 कोटी रूपये किंमत मिळाली होती.
7 / 8
5) सौदी अरबमधील Umayyad Gold Dinar नाण्याला जगातील पाचवा सगळ्यात महाग नाणं मानलं जातं. ही नाणी सौदीमधील ‘उमय्यद साम्राज्‍याच्या काळात तयार करण्यात आली होती. ही नाणी फार सुंदर आहेत. याच्या एका नाण्याची किंमत 43.78 कोटी रूपये आहे.
8 / 8
6) कॅनडातील Canadian Gold Maple Leaf ला जगातील सहावं सगळ्यात महागडं नाणं मानलं जातं. ही नाणी 1979 मध्ये तयार करण्यात आली होती. ही नाणी 99 टक्के शुद्ध सोन्याने तयार करण्यात आली होती. एका वर्षात केवळ एकच नाणं तयार केलं जात होतं आणि याचं वजन 1 ट्रॉय आउंस होतं. लिलावादरम्यान 1 नाण्याची किंमत 42.95 कोटी रूपये ठरवण्यात आली होती.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके