शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'हे' आहेत जगातील सर्वात धोकादायक खेळ; जीव जाण्याचाही धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 4:22 PM

1 / 9
जोस्टिंग- या खेळात दोन व्यक्ती दोन घोड्यांवर बसून संघर्ष करतात. या दोन्ही व्यक्तींच्या हातात 10 फुटांचा दांडा असतो. याशिवाय स्वरक्षणासाठी एक-एक ढालदेखील असते.
2 / 9
कोंबड्याची झुंज- या खेळात दोन कोंबड्यांना झुंजवलं जातं. अनेकदा या खेळात कोंबड्यांचा जीवही जातो.
3 / 9
पेलोटा पुरेपेचा- हा खेळ हॉकीसारखा असतो. यात 5-6 खेळाडू असतात. रात्रीदेखीत हा खेळ खेळला जातो.
4 / 9
कुत्र्यांची झुंज- कोंबड्यांप्रमाणेच कुत्र्यांचीही झुंज लावली जाते. चीन आणि रोममध्ये हा खेळ खेळला जायचा. मात्र आता त्यावर बंदी आणण्यात आली आहे.
5 / 9
शिन किकिंग- या खेळात दोन जण आमनेसामने येतात आणि एकमेकांच्या गुडघ्यांखाली मारतात. इंग्लंडमध्ये शेकडो वर्षांपूर्वी हा खेळ खेळला जायच. मात्र यानंतर त्यावर बंदी घातली गेली.
6 / 9
कॅमल जम्पिंग- या खेळात अनेक उंटांना बाजूला उभं केलं जातं आणि त्यांच्यावरुन उडी मारली जाते. जो जास्त उंटांवरुन उडी मारतो, तो विजेता ठरतो.
7 / 9
बॅस्क्यू पेलोटा- हा खेळ टेनिससारखा असतो. मात्र यात चेंडू इतक्या वेगानं येतो की या खेळाला जगातला सर्वात वेगवान खेळ म्हटलं जातं. या खेळात चेंडू 200 मैल प्रति तास वेगानं चेंडू येतो.
8 / 9
बुल फाईट- या खेळात एक व्यक्ती बैलासमोर कापड घेऊन उभा राहते. बैल समोर येताच ही व्यक्ती कपडा हटवते. संपूर्ण खेळात अशा प्रकारे बैलाला पळवलं जातं. यात व्यक्तीच्या हातून चूक घडल्यास बैल त्याला थेट उचलून फेकून देतो.
9 / 9
मुय थाय- हा खेळ थायलंडमध्ये खेळला जातो. यामध्ये दोन व्यक्ती लढाई करतात. यात पाय, गुडघा, हात आणि कोपराचा वापर केला जातो. हा खेळ मार्शल आर्टचा एक प्रकार आहे.