शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दोनाचे चार नव्हे, सहा हात; तरुणानं एकाचवेळी दोघींशी बांधली लगीनगाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 11:29 AM

1 / 10
मध्य प्रदेशातल्या बेतूल जिल्ह्यातल्या घोडाडोंगरी तालुक्यातल्या केरिया गावात एक वेगळाच विवाह सोहळा संपन्न झाला. हा विवाह सोहळा सध्या आसपासच्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.
2 / 10
बेतूलमधील एका तरुणानं एकाच वेळी दोन तरुणींशी विवाह केला. विशेष म्हणजे या लग्नाला तिन्ही कुटुंबातील मंडळी उपस्थित होती. ग्रामस्थदेखील या सोहळ्यात सहभागी झाले होते.
3 / 10
मंडपात एक वर आणि दोन वधू असं कधीही न दिसणारं दृश्य पाहायला मिळाल्यानं सध्या सर्वत्र या लग्नाची चर्चा सुरू आहे. या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
4 / 10
केरिया गावाचे रहिवासी असलेला आदिवासी तरुण संदीप उईके यानं होशंगाबाद जिल्ह्यातील तरुणी आणि घोडाडोंगरी तालुक्यातल्या कोयलारी गावातल्या तरुणीशी विवाह केला.
5 / 10
संदीप भोपाळला शिक्षणासाठी गेला होता. त्यावेळी त्याची भेट मूळ होशंगाबादमध्ये वास्तव्यास असलेल्या तरुणीशी झाली. तिथेच त्यांची मैत्री झाली आणि पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
6 / 10
तरुण भोपाळला शिकायला गेला असताना त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्यासाठी स्थळं पाहण्यास सुरुवात केली आणि कोयलारी गावातल्या एका तरुणीसोबत त्याचं लग्न ठरवलं.
7 / 10
दोन तरुणीसोबत विवाह ठरल्यानं मोठाच पेचप्रसंग निर्माण झाला. त्यामुळे तिन्ही कुटुंब आणि गावातल्या लोकांनी बैठक बोलावली.
8 / 10
दोन्ही तरुणी तरुणासोबत राहण्यास, सोबत नांदण्यास तयार असल्यास लग्न निर्वघ्नपणे पार पडू शकतं, असा निर्णय बैठकीत झाला. दोन्ही तरुणींनी याला पसंती दर्शवली.
9 / 10
तरुणींनी संमती दर्शवल्यानंतर तरुणानं दोन्ही तरुणींसोबत सप्तपदी घेतली. या विवाहाला तिन्ही कुटुंबांचे सदस्य, त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.
10 / 10
या लग्नाला आपण परवानगी देण्यात आली नव्हती अशी माहिती घोडाडोंगरच्या तहसीलदार मोनिका विश्वकर्मा यांनी दिली. या घटनेची चौकशी करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
टॅग्स :marriageलग्न