शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

विद्यार्थ्यांसोबत शाळेत जातो हा पोपट, जंगलातील पोपटाची आणि या विद्यार्थ्यांची दोस्ती जगात भारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2021 7:22 PM

1 / 10
पक्षी आणि माणसाचं एक वेगळंच नातं आहे. पक्ष्यांना लळा लावला तर तेही माणसांवर प्रेम करायला लागतात. याची अनेक उदाहरण आपण यापूर्वी पाहिली असतील.
2 / 10
याचीच प्रचिती देणारा मध्य प्रदेशमधील एक प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. एका पोपटाला शाळेतील विद्यार्थ्यांचा लळा लागलाय.
3 / 10
हा पोपट विद्यार्थ्यांना भेटतो. तसेच त्यांच्यासोबत खेळतोसुद्धा.
4 / 10
मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार मध्य प्रदेशमधील ग्वालियर जिल्ह्यातील शारदा बालग्राम जंगल परिसरातील आहे. या भागात एक पोपट आहे.
5 / 10
हा पोपट विद्यार्थी शाळेत जाताना त्यांच्यासोबत जातो आणि ते शाळेतून निघाले की परत त्यांच्यासोबत येतो.
6 / 10
हा पाळीव पोपट नसून तेथील जंगालातला पोपट आहे पण या पोपटाने विद्यार्थ्यांसोबत अनोखी मैत्री केली आहे.
7 / 10
हा पोपट रस्त्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांजवळ जातो. तसेच त्यांच्यासोबत खेळतो. विशेष म्हणजे तो विद्यार्थ्यांना अजिबात घाबरत नाही.
8 / 10
या मैत्रीविषयी विद्यार्थ्यांनी अधिक माहिती दिली आहे. हा पोपट रोजच आमच्याकडे येतो. आम्ही जेव्हा शाळेत जातो तेव्हा तो आमच्या खांद्यावर येऊन बसतो. कधीकधी तर तो आमच्या डोक्यावरही बसतो.
9 / 10
हा मिठू शाळेच्या बाहेर त्यांची वाट पाहत असतो. काहीवेळा ते मधल्यासुट्टीत डबा खायला बसले की हा त्यांच्या डब्यातलं खातो.
10 / 10
हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले असून त्यांना मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे. तसेच काही नेटकऱ्यांनी तर मजेदार कॅप्शनदेखील दिले आहेत
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेMadhya Pradeshमध्य प्रदेशStudentविद्यार्थीStudentविद्यार्थी