पहिल्यांदाच वाजवण्यात आला १८ हजार वर्ष जुना शंख, कसा होता याचा आवाज? By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 12:09 PM
1 / 11 फ्रान्सच्या नॅच्युरल हिस्ट्री म्युझिअम ऑफ टोललोउसमध्ये एक १८ हजार वर्ष जुना शंख ठेवला आहे. हा शंख पहिल्यांदा १९३१ मध्ये पायरेनीस माउंटेंसच्या मार्सोउलास गुहेत सापडला होता. तेव्हा हा शंख या म्युझिअममध्ये ठेवण्यात आला होता. पण हे कधी वाजवण्यात आलं नव्हतं. नुकतंच ते एका वैज्ञानिकाने वाजवलं. त्याचा आवाज ऐकला. आता याच्या आवाजाच्या माध्यमातून १८ हजार वर्ष जुनं संगीत कसं असेल याचा अंदाज लावत आहेत. 2 / 11 या शंखाचा आकार मानवी कवटीपेक्षा मोठा आहे. जेव्हा आर्किओलॉजिस्टने हा शंख निरखून पाहिलं तेव्हा त्यांना वाटलं की, हे सामान्य समुद्री शंख नाही. या शंखामध्ये एक खासप्रकारची कर्विंग आहे. ज्याने हे शंख एक उत्तम म्युझिकल इन्स्ट्रुमेंट होतं. आर्किओलॉजिस्ट असं मानतात की, या शंखाचा वापर त्यावेळी आनंदाचा क्षण किंवा धार्मिक कार्यावेळी वाजवण्यासाठी केला जात असावा. 3 / 11 सोरबोन युनिव्हर्सिटीमध्ये लेबॉरेटरी ऑफ मॉलीक्यूलर अॅन्ड स्ट्रक्चरल आर्कियोलॉजीचे डायरेक्टर फिलिप वॉल्टर म्हणाले की, ९० वर्षांआधी जेव्हा हा शंख सापडला होता. तेव्हा याकडे लविंग कप म्हणून पाहण्यात आलं होतं. याबाबत एक रिसर्च सायन्स अॅडवांस नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला होता. 4 / 11 वॉल्टर म्हणतात की, जुन्या काळात लोक आनंदाच्या क्षणी लविंग कपचा वापर करत होते. यावेळी हे लोक ड्रिंक्स घेत होते. पण हा शंख वेगळा आहे. यात फार कलाकारी बघायला मिळते. जेव्हा आम्ही निरखून पाहिलं तर लक्षात आलं की, हा सामान्य शंख नाही. 5 / 11 पायरेनीस माउंटेंसच्या मार्सोउलास गुहेत एक प्रसिद्ध आर्किओलॉजिकल साइट आहे. दक्षिण-पश्चिम यूरोपमध्ये इतिहासकारांचं ही गुहा घर आहे. असं मानलं जातं की, १८ हजार वर्षाआधी या गुहेत पायरेनीस मॅगडेलेनियंस राहत होते. 6 / 11 त्यांच्या जाण्यानंतर या गुहांमध्ये त्यांच्या कलाकृती, भींतीवर पेंटीग, वस्तू आणि शंख अशा वस्तू तिथे राहिल्या. प्राचीन काळात मनुष्य फार सोपं वाद्य यंत्र बनवत होते. जसे की, पक्ष्यांच्या हाडांपासून बासरी. मात्र शंख हा जगातली सर्वात जुनं यंत्र आहे. 7 / 11 फ्रेंच नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्चचे वैज्ञानिक कॅरोल फ्रिट्ज सांगतात की, आमच्या माहितीतील हे आतापर्यंत सर्वात जुनं वाद्य यंत्र असू शकतं. ९० वर्षांपासून हे सांभाळून ठेवण्यात आलं आहे. कधी वाजवलं नव्हतं. जेव्हा हे वाजवलं तेव्हा यातून फारच मधूर आवाज आला. 8 / 11 आर्किओलॉजिस्टने सांगितले की, हा शंख थोडा तुटलेला आहे. कारण हा अनेक वर्षांपासून गुहेत पडलेला होता. पण याचा खालचा भाग सर्वात मजबूत आहे. तो पूर्णपणे सुरक्षित आहे. 9 / 11 फिलिप्स यांनी सांगितले की, या शंखाचा वरचा भाग मुद्दाम कापण्यात आला होता. शंखाच्या घुमावदार भागात भार बारकाईने रस्ता बनवला होता. असे मानले जाते की, असा घुमावदार रस्ता बनवण्यासाठी मॅगडेलेनियंस एखादा चिकट पदार्थ वापरत असतील. पण तो पदार्थ काय होता हे समजू शकले नाही. 10 / 11 फिलिप्सने सांगितले की, या शंखाच्या अनेक भागात लाल रंगाचे पिगमेंट बघितले गेले. म्हणजे हे लाल रंगाच्या बिंदूने रंगवलं होतं. यावर अनेक फिंगरप्रिंटसारखे निशाण मिळाले. याच्या आत एक पेंटींगही करण्यात आली होती. ते आता पुसली गेली आहे. 11 / 11 फिलिप्सने सांगितले की, हा शंख वाजवण्यासाठी आम्ही एक प्रोफेशनल हॉर्न प्लेअरला बोलवलं. कारण त्यांना भिती होती की, हे वाजवताना त्याचं नुकसान होऊ नये. मात्र जेव्हा हे वाजवण्यात आलं तेव्हा यातून कमाल ध्वनी निघाला. यातून तीन नोट्स ऐकू आल्या. आणखी वाचा