Mysterious burning fireball trail seen in sky people shocked api
आकाशात रहस्यमय आगीचा गोळा पाहून लोक चक्रावले, वेगवेगळ्या चर्चांना उधाण! By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 3:30 PM1 / 10इंग्लंडच्या कॅंब्रिजशायर काउंटीच्या स्ट्रेथम परिसरातील लोक काही दिवसांपूर्वी अचानक घाबरले. कारण त्यांना आकाशातून एक आगीचा गोळा खाली येताना दिसला. या गोळ्याच्या मागे धुरही होता. हा आगीचा गोळा पाहून येथील लोक, मीडिया, प्रशासन वेगवेगळे अंदाज बांधत आहेत.2 / 1017 एप्रिलला घडलेल्या या घटनेबाबत काही लोकांचं मत आहे की, हे एक एलियनचं शिप होतं. तर काही लोक म्हणाले हा एक उल्कापिंड होता. आतशबाजी, तुटता तारा, विमान आणि अजूनही काही गोष्टींचं या घटनेला नाव दिलं जात आहे.3 / 10वैज्ञानिकांनुसार, यूरोपीय देशांवर आकाशात अशा घटना नेहमीच घडत असतात. ही एक नैसर्गिक घटना आहे. हा एखादा उल्कापिंड असू शकतो. पण लोकांच्या गोष्टी वेगळंच काहीतरी सांगत आहेत.4 / 10स्ट्रेथम परिसरातील गेरी अंडरवुडने आगीचा गोळा, त्यामागे लाल आणि गुलाबी रंगाचा धूर सर्वातआधी पाहिला होता. तो पत्नी मिलेनीसोबत एका तलावात बोटमध्ये बसला होता.5 / 10त्याने लगेच या आगीच्या गोळ्याचे फोटो काढले. हा संपूर्ण नजारा साधारण 20 मिनिटांपर्यंत दिसला. गेरीने सांगितले की, हा गोळा वेगाने जात नव्हता, जसे उल्कापिंड वेगाने जातात. हा गोळा आरामात एकाच दिशेने गोलगोल फिरत जात होता.6 / 10कॅंब्रिजशायरपासून साधारण 155 किलोमीटर दूर वेस्ट मिडलॅंड्सच्या 23 वर्षीय लूसी बसारनने सांगितले की, अंधार व्हायच्या ठिक आधी माझ्या घराबाहेर नारंगी रंगाचा प्रकाश दिसला. 7 / 10मी धावत बाहेर आले तर आकाशात दिसले की, एक प्रकाशाचा गोळा हळूहळू पुढे जात आहे. तो अनेक ठिकाणी थांबतही होता.8 / 10मी धावत बाहेर आले तर आकाशात दिसले की, एक प्रकाशाचा गोळा हळूहळू पुढे जात आहे. तो अनेक ठिकाणी थांबतही होता.9 / 10दरम्यान, काही वैज्ञानिकांनी सांगितले की, यावेळी या राज्यांवरून कतार एअरवेजचं एक विमान उडत होतं. पण वेगवान प्रकाशाबाबत कुठेही काहीही आढळून आलं नाही. 10 / 10पण यातही एक शंका अशी निर्माण होते की, कोरोना व्हायरसमुळे कतारमधून आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्यात आली आहे. मग कतार एअरवेजचं विमान तिथे कसं उडत असेल? आणखी वाचा Subscribe to Notifications