शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

किस्सा! ३२०० वर्ष जुन्या रहस्यमय शापित ममीची कहाणी, ज्यांनी ज्यांनी केला स्पर्श त्यांनी गमावला जीव!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 4:11 PM

1 / 8
जेव्हाही प्राचीन इजिप्तचा विषय निघतो, तेव्हा वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात. जसे की, ममी, मकरबरा आणि पिरॅमिड. इथे उत्खननात नेहमीच प्राचीन ममी मिळतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्राचीन रहस्यमय ममीचे काही किस्से सांगणार आहोत. या ममीबाबत म्हटलं जातं की, आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी या ममीला स्पर्श केला, त्यांचा मृत्यू झाला.
2 / 8
ही ममी इजिप्तचा सर्वात कमी वयाचा राजा तूतेनखामूनची आहे. ही ममी साधारण ३२०० वर्षांपासून जमिनीत दफन होती. तब्बल ९७ वर्षांआधी म्हणजे १९२२ मध्ये शोधली गेली होती आणि ब्रिटीश पुरातत्ववेत्ते हॉवर्ड कॉर्टरने या रहस्यमय ममीचा शोध लावला होता.
3 / 8
असे म्हणतात की, तूतेनखामूनच्या कबरेखाली मोठा खजिना गाडला होता. जेव्हा ही कबर शोधली गेली तेव्हा त्या कबरेखाली पायऱ्या आढळल्या. ज्या एका खोलीकडे जात होत्या. ही खोली सोन्या-चांदीने भरलेली होती.
4 / 8
सोबतच तूतेनखामूनच्या कबरेच्या दरवाज्यावर इजिप्तच्या प्राचीन भाषेत एक सूचना लिहिली होती. त्या लिहिले होते की, जे कुणी राजा तूतेनखामूनची शांतता भंग करेल, त्याचा मृत्यू होईल.
5 / 8
या सूचनेकडे संशोधकांनी दुर्लक्ष केलं आणि नंतर एक एक करून हॉवर्ड कॉर्टरच्या टीममधील सदस्यांचा रहस्यमय मृत्यू होत गेला. या सर्वच लोकांनी मिळून कबरेतून तूतेनखामूनची ममी हटवून खजिना काढला होता.
6 / 8
मृत्यूच्या घटना इथेच थांबल्या नाही तर हॉवर्ड कॉर्टरने ज्या व्यक्तीला तूतेनखामूनची कबर आणि खजिना शोधण्याची जबाबदारी दिली होती, त्या व्यक्तीचाही काही महिन्यांनी रहस्यमय पद्धतीने मृत्यू झाला. ही व्यक्ती होती लॉर्ड जॉर्ज कारनारवन. यांनीच कबरेतील ममीला हात लावला होता.
7 / 8
असे म्हटले जाते की, तूतेनखामूनची ही रहस्यमय ममी ज्यांनी ज्यांनी पाहिली, ते एकतर वेडे झाले नाही तर त्यांचा मृत्यू झाला. इजिप्तचे राजकुमार अली कामिलसोबतही असंच काहीसं झालं होतं. राजकुमार आणि त्याची पत्नी दोघेही ही ममी बघण्यासाठी गेले होते. मात्र घरी परतताना राजकुमाराच्या पत्नीने अचानक त्याची हत्या केली. या घटनेनंतर या ममीला अशुभ मानलं जाऊ लागलं.
8 / 8
दरम्यान, हॉवर्ड कॉर्टरच्या मागणीनंतर सरकारने या ममीला त्याच ठिकाणी दफन केलं. पण पुन्हा काही वर्षांनी लॉर्ड जॉर्ज कारनारवनची मुलगी लेडी एवलिनच्या आदेशानुसार, पुन्हा ममी कबरेतून बाहेर काढण्यात आली आणि ही ममी लंडनला आणली गेली. इथे ही ममी एका म्युझिअममध्ये ठेवण्यात आली. असे म्हणतात की, लेडी एलविन या ममीने इतकी प्रभावित झाली होती की, रोज म्युझिअमला जाऊन ममी बघत होती. एके दिवशी जेव्हा ममी बघण्यासाठी ती आली तेव्हा तिला हृदयविकाराचा झटका आला आणि ती मरण पावली.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके