शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

NASA - Alien: अंतराळात एलिअन्स आहेत का? नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांनी केलं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 3:17 PM

1 / 7
जगभरात एलिअन्सबाबत चर्चा सुरू आहे. दररोज एलिअन्सबाबत काहीना काही दावे केले जातात, ज्याबाबत वाचून वैज्ञानिकही हैराण होतात. अनेकदा लोकांनीही एलिअन्स आणि यूएफओ बघितल्याचा दावा केला. पण सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, ब्रम्हांडात एलिअन्स आहेत का? अनेक वर्षांपासून वैज्ञानिक या प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत. पण अजूनपर्यंत त्यांना ठोस असे काही परावे सापडले नाहीत.
2 / 7
अशातच अमेरिकन अंतराळ संस्था नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, एलिअन्सचं अस्तित्व असं पाहिजे. कारण ब्रम्हांड खूप मोठं आहे. सध्या नासाचे प्रमुख असलेला बिल नेल्सन हे माजी अंतराळवीरही आहेत. ते म्हणाले की, हे म्हणता येणार नाही की, पृथ्वी सोडून दुसरीकडे जीवन नाही. त्यांनी एलिअन्स असण्याची प्रबळ शक्यता वर्तवली आहे.
3 / 7
ते म्हणाले की, जेम्स वेब टेलीस्कोप ब्रम्हांडातील दुसऱ्या ग्रहांचा शोध घेण्यात मदत करेल. जिथे जीवन जन्म घेऊ शकतं. नासाने ख्रिसमसच्या दिवशी जेम्स वेब टेलीस्कोप लॉन्च केलं होतं. एका मीडिया रिपोर्टनुसार, नासाच्या प्रमुखांना एका संमेलनात प्रश्न विचारण्यात आला होता.
4 / 7
बिल नेल्सन यांना विचारण्यात आलं होतं की, तुम्हाला एलिअन्स असण्यावर विश्वास आहे का? त्यांनी या प्रश्नाचं उत्तर एका शब्दात दिलं. ते म्हणाले होय. ते नंतर म्हणाले की, आम्हाला माहीत आहे की, आपल्या आकाशगंगेशिवाय अब्जो आकाशगंगा आहेत.
5 / 7
ते पुढे म्हणाले की, अब्जो नसतीलही तरी कोट्यावधी आकाशगंगा आहेतच. त्यासोबतच कोट्यावधी सूर्य आहेत. जर इतकं मोठं ब्रम्हांड आहे तर शक्यता याचीही आहे की, पृथ्वीसारखंही जीवन कुठेतरी असेल. कुठेतरी जीवन असण्याची शक्यता आहे.
6 / 7
बिल नेल्सन म्हणाले की, जेम्स वेब टेलीस्कोपच्या माध्यमातून कोणत्याही ग्रहाची आणि तेथील वातावरणाची योग्य ती माहिती मिळू शकते. या टेलीस्कोपच्या माध्यमातून अंतराळात दूर असलेल्या ग्रहांवरील वातावरण जाणून घेता येऊ शकतं. ते म्हणाले जेम्स वेब टेलीस्कोप आपला पहिला फोटो जुलैमध्ये पृथ्वीवर पाठवेल. पण त्याआधी एका दगडासोबत त्याची टक्कर झाली होती.
7 / 7
नासाच्या प्रमुख्यांच्य वक्तव्याआधी प्रसिद्ध वैज्ञानिक एवी लोएब यांनी आश्चर्यकारक दावा केला आहे. त्यांनी दावा केला की, पृथ्वीवर एलिअन्स पोहोचले आहेत. तसेच त्यांनी सर्व देशांकडे मागणी केली आहे की, दुसऱ्या ग्रहांवर जीवन शोधण्यात आपल्या सुरक्षा बजेटचा वापर करावा.
टॅग्स :NASAनासाInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके