शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पृथ्वीच्या जवळ येत आहे सोन्या-चांदीने भरलेला उल्कापिंड, अब्जो रूपये असेल एका तुकड्याची किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2021 2:27 PM

1 / 11
ब्रम्हांडात पृथ्वी व्यतिरिक्तही अनेक ग्रह आहेत. तसे तर वैज्ञानिक अनेक वर्षांपासून अशा ग्रहाचा शोध घेत आहेत जिथे ऑक्सीजन आणि पाणी उपलब्ध असण्याची शक्यता आहे. पण अजूनही असा ग्रह सापडलेला नाही. मात्र, इतर ग्रहांच्या तुलनेत मंगळ ग्रहावर जीवन असल्याची शक्यता जास्त आहे. (All Image Credit : Social Media)
2 / 11
आपल्या सोलर सिस्टीममध्ये ग्रहांसोबत उल्कापिंडही फिरत असतात. आता नासाने सांगितलं की, आपल्या सोलर सिस्टीममध्ये १२४ मैल रूंद एक उल्कापिंड ‘Goldmine Asteroid’ फिरत आहे. ज्याची किंमत अब्जो रूपयांपेक्षाही जास्त आहे. हा उल्कापिंड अनेक किंमती धातुंनी भरलेला आहे.
3 / 11
वैज्ञानिकांनुसार, या उल्कापिंडात अनेक किंमती धातु आहेत. ज्यांची किंमत साधारण १० क्वाड्रिलियन डॉलर आहे. म्हणजे याच्या एका छोट्या तुकड्याची किंमत अब्जो रूपये असेल.
4 / 11
याला वैज्ञानिकांनी ‘Psyche 16 asteroid’ नाव दिलं आहे. हा उल्कापिंड १२४ मैल रूंद आहे. सूर्याच्या चारही बाजूने फिरणारा हा उल्कापिंड मार्स आणि जुपिटरच्या मधे आहे.
5 / 11
नासाने सोन्याने भरलेल्या या उल्कापिंडासाठी नवं मिशन सुरू केलं आहे. ज्यानुसार २०२६ पर्यंत याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
6 / 11
‘Psyche 16 asteroid’ बाबत असं मानलं जातं की हा एखाद्या ग्रहाचा तुटलेला भाग आहे. २०२६ मध्ये याच्या जवळ जाऊन याचा अभ्यास करण्याचा प्लॅन तयार केला जात आहे.
7 / 11
कॅलिफोर्नियाच्या वैज्ञानिकांचा एक समूह याच्या तापमानाची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरून अभ्यास सोपा व्हावा. ‘Psyche 16 asteroid’ चा शोध सर्वातआधी १८५२ मध्ये लागला होता.
8 / 11
मानलं जातं की, सोलर सिस्टीमच्या निर्माणावेळी झालेल्या धमाक्यात हा ग्रह तुटून वेगळा झाला होता. तेव्हा तो अंतराळात फिरत आहे.
9 / 11
वैज्ञानिकांनी आतापर्यंत या तुकड्याबाबत अनेक अंदाज बांधले आहेत. त्यांच्यानुसार याच्या आत अनेक किंमती धातु आहेत. यात सोनं, चांदी, लोह आणि निकल आहे.
10 / 11
यांची किंमत अब्जो असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. नासाच्या वैज्ञानिकांनुसार, लवकरच हे जाणून घेतलं जाईल की, या उल्कापिंडाची स्त्रोत काय आहे.
11 / 11
सध्या ‘Psyche 16 asteroid’ पृथ्वीपासून २००० मिलियन मैल दूर आहे. पण २०२६ पर्यंत याच्याबाबत आणखी जास्त माहिती मिळवली जाईल.
टॅग्स :NASAनासाInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेResearchसंशोधन