शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

NASA ने शोधला पृथ्वीसारखा ग्रह, जीवन अन् पाणी असण्याची दाट शक्यता!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 2:58 PM

1 / 9
गेल्या काही वर्षांपासून जगभरातील वैज्ञानिकांनी त्यांच्या अंतराळ संशोधन क्षमतेत चांगलाच विकास केला आहे. आता त्याचे परिणामही त्यांना बघायला मिळत आहेत. नासाने नुकतीच एका असा बाह्यग्रहाचा शोध लावलाय, ज्याचा आकार आणि स्थिती पूर्णपणे पृथ्वीसारखी आहे. (Image Credit : NASA)
2 / 9
सामान्यपणे पृथ्वीसारखं जीवन आणि स्थिती दुसऱ्या ग्रहावर मिळणं फार कठिण आहे. वैज्ञानिकांनुसार, पृथ्वीवरील वातावरण हे जीवनासाठी अनुकूल आहे. असं दुसरीकडे असं कठिण आहे.
3 / 9
नासाने आपल्या ट्विटर अकाउंटवर या नव्या ग्रहाबाबत माहिती दिली. आपल्या ट्विटमध्ये नासाने सांगितले की, आम्हाला एक वेगळाच संसार सापडला आहे. पृथ्वीच्या आकाराचा हा बाह्यग्रह जीवन संभाव्य क्षेत्रात आहे. म्हणजे हा ग्रह दगडी असू शकतो आणि तिथे पाणीही असू शकतं.
4 / 9
या ग्रहाला नासाने केप्लर 1649सी (Kepler-1649c) नाव दिलं आहे. या ग्रहाचा शोध नासाने त्यांच्या केपलर ग्रहाच्या जुन्या डेटाचं अवलोकन करताना लावला. हा ग्रह पृथ्वीपासून 300 प्रकाशवर्ष अंतरावर आहे.
5 / 9
हा पृथ्वीपेक्षा केवळ 1.06 पटीने मोठा आहे. या ग्रहावरील अंदाजे तापमानही पृथ्वीसारखंच आहे आणि हा ग्रह त्याची 75 टक्के ऊर्जा त्याच्या सूर्यापासून घेतो, जसा आपला ग्रह घेतो. (Image Credit : The Sun)
6 / 9
नासानुसार, हा ग्रह एका लाल ताऱ्याभोवती फिरतो आणि याच कारणाने या ग्रहावरील पर्यावरणात जीवन असण्याची शक्यता आहे. पण त्याबाबत स्पष्ट आकडेवारी उपलब्ध नाही. अशाप्रकारचे लाल तारे गॅलक्सीमध्ये खूप असतात.
7 / 9
या ग्रहाबाबत जास्त माहिती मिळणं फार अवघड आहे. कारण हा फार छोटा दिसत होता. हा अशाप्रकारचा तिसरा ग्रह आहे ज्यावर जीवन असण्याची शक्यता असू शकते. याआधी नासाने टीगार्डन बी आणि ट्रेपिस्ट 1 एफ सारखे पृथ्वीच्या आकाराचे आणखी दोन ग्रह शोधले आहेत.
8 / 9
गेल्या वर्षीच नासाने हबल स्पेल टेली स्कोपच्या मदतीने एका पृथ्वीचं तापमान असलेल्या ग्रहावर पाणी शोधलं होतं. हा के2-18 बी नावाचा बाह्यग्रह त्याचा सूर्य हॅबिटेबस झोन म्हणजे जीवन योग्य क्षेत्राच्या अंतरावर आहे. इथे पाणी तरल रूपात असण्याची पूर्ण शक्यता आहे. इथे जीवन असण्याचे आणखीही काही लक्षणे दिसली आहेत.
9 / 9
केवळ बाह्यग्रहावरच नाही तर वैज्ञानिक मंगळ ग्रह, शुक्र, बुध ग्रहावरही जीवनाच्या शक्यतांचा शोध घेत आहेत. काही रिसर्चमधून असेही सांगण्यात आलं आहे की, मंगळ ग्रहावर कधीकाळी पाणी राहिलं असेल. तसेच याचीही पूर्ण शक्यता आहे की, आता नाही पण आधी यावर जीवनाचं काहीना काही रूप या लाल ग्रहावर नक्की होतं.
टॅग्स :NASAनासाAmericaअमेरिकाEarthपृथ्वीResearchसंशोधन