मंगळ ग्रह पूर्णपणे लाल रंगाचा नाही, NASA चे हे फोटो पाहून व्हाल थक्क! By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 11:21 AM
1 / 11 अमेरिकन अंतराळ एजन्सी नासा(NASA) ने मंगळ ग्रहावरील निळ्या रंगाच्या बर्फाच्या डोंगरांचे फोटो जारी केले आहेत. यात पिवळ्या रंगाचे धुळीचे थर आणि बर्फाचे परिसर दिसत आहे. हे फोटो नासाने मार्स ऑर्बिटर ओडिसीचे अंतराळात २० वर्षे पूर्ण होण्यानिमित्ताने शेअर केलेत. हे फोटो मार्स ऑर्बिटर ओडिसीने घेतले आहेत. 2 / 11 या फोटोंवरून एक बाब ही स्पष्ट झाली की, मंगळ ग्रह पूर्ण लाल नाही. या ग्रहावर ते सर्व रंग आहेत जे कोणत्याही ग्रहाला सुंदर बनवतात. नासाच्या या फोटोत एकीकडे पिवळ्या रंगाचे वाळूचे डोंगर तर दुसरीकडे बर्फाने झाकलेला एक मोठा खड्डा आहे. तसेच बर्फाचं मैदान निळ्या रंगाचं दिसत आहे. म्हणजे मंगळ ग्रहावर बर्फ मोठ्या प्रमाणात आहे. 3 / 11 NASA ने हे फोटो मंगळ ग्रहाच्या उत्तर ध्रुवाजवळ घेतले आहेत. जो फोटो नासाने जारी केलाय त्यात साधारण ३० किलोमीटर रूंद भाग दिसत आहे. हा फोटो तयार करण्यासाठी वर्ष २००२ पासून २००४ पर्यंतच्या अनेक फोटोंना जोडण्यात आलं आहे. मार्स ऑर्बिटर ओडिसी मंगळ ग्रहावर बऱ्याच वर्षांपासून काम करत आहे. 4 / 11 मार्स ऑर्बिटर ओडिसीला ७ एप्रिल २००१ ला मंगळ ग्रहासाठी रवाना करण्यात आलं होतं. फ्लोरिडाच्या केप केनवरल एअरफोर्स स्टेशनहून लॉन्च झाल्यानंतर हे २४ ऑक्टोबर २००१ ला मंगळ ग्रहाच्या ऑर्बिटमद्ये पोहोचलं. तेव्हापासून हा ऑर्बिटर सतत काम करत आहे. त्याने हजारो फोटो पाठवले आहेत. ज्याच्या मदतीने वैज्ञानिक अभ्यास करत आहेत. 5 / 11 मंगळ ग्रहाचा जो फोटो जारी झाला आहे त्यात निळ्या रंगाचा परिसर बर्फाने झाकलेला आहे. तर पिवळ्या रंगाचे जे भाग दिसत आहे ते सूर्याच्या प्रकाशात चमकणारे उष्ण भाग आहेत. हा फोटो मार्स ऑर्बिटर ओडिसीच्या थर्मल इमिशन इमेजिंग सिस्टीम इन्स्ट्रूमेंटने घेतला होता. त्यानंतर याला फॉल्स कलर इमेजमध्ये बदललं. 6 / 11 हे फोटो पाहिल्यावर हेच वाटतं की, मंगळ ग्रह केवळ लाल रंगाचा नाही. कारण मंगळ ग्रहावरून सतत वेगवेगळे फोटो येत असतात. ज्यात वेगवेगळे रंग दिसत असतात. नुकताच नासाच्या मार्स पर्सिवरेंसने मंगळ ग्रहावर एक हिरव्या रंगाचा चमकदार दगड पाहिला होता. 7 / 11 काही दिवसांपूर्वी पर्सिवरेंस रोवरने आपल्या ट्विटर हॅंडलवर लिहिले होते की, इंजीन्यूटी हेलिकॉप्टरला मंगळ ग्रहावर हिरव्या रंगाचा दगड दिसला. त्याचे फोटो रोवरवरील कॅमेराने घेतले आहेत. सध्या याचा अभ्यास सुरू आहे. 8 / 11 काही दिवसांपूर्वी पर्सिवरेंस रोवरने आपल्या ट्विटर हॅंडलवर लिहिले होते की, इंजीन्यूटी हेलिकॉप्टरला मंगळ ग्रहावर हिरव्या रंगाचा दगड दिसला. त्याचे फोटो रोवरवरील कॅमेराने घेतले आहेत. सध्या याचा अभ्यास सुरू आहे. 9 / 11 काही दिवसांपूर्वी पर्सिवरेंस रोवरने आपल्या ट्विटर हॅंडलवर लिहिले होते की, इंजीन्यूटी हेलिकॉप्टरला मंगळ ग्रहावर हिरव्या रंगाचा दगड दिसला. त्याचे फोटो रोवरवरील कॅमेराने घेतले आहेत. सध्या याचा अभ्यास सुरू आहे. 10 / 11 काही दिवसांपूर्वी पर्सिवरेंस रोवरने आपल्या ट्विटर हॅंडलवर लिहिले होते की, इंजीन्यूटी हेलिकॉप्टरला मंगळ ग्रहावर हिरव्या रंगाचा दगड दिसला. त्याचे फोटो रोवरवरील कॅमेराने घेतले आहेत. सध्या याचा अभ्यास सुरू आहे. 11 / 11 काही दिवसांपूर्वी पर्सिवरेंस रोवरने आपल्या ट्विटर हॅंडलवर लिहिले होते की, इंजीन्यूटी हेलिकॉप्टरला मंगळ ग्रहावर हिरव्या रंगाचा दगड दिसला. त्याचे फोटो रोवरवरील कॅमेराने घेतले आहेत. सध्या याचा अभ्यास सुरू आहे. आणखी वाचा