शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नासाने एलियन्सना पृथ्वीवर बोलवण्यासाठी केला प्लान, काय तो वाचून व्हाल हैराण!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2022 2:21 PM

1 / 8
दररोज एलियन्सबाबत काहीना काही अपडेट येत असतात. दररोज एलियन्सबाबत असे काही दावे केले जातात ज्यावर विश्वास ठेवणं अवघड होऊन बसतं. कित्येक वर्षांपासून वैज्ञानिक ब्रम्हांडातील एलियन्स अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांना अजूनही काही ठोस पुरावे सापडले नाहीत. तरीही वैज्ञानिक रोज नवे दावे करतात. लोकांनीही अनेकदा यूएफओ आणि एलियन्स पाहिल्याचा दावा केला आहे.
2 / 8
अशात आता नासाने एलियन्ससोबत संपर्क करण्यासाठी एक नवा प्लान तयार केला आहे. नासाच्या या प्लानबाबत जाणून घेतल्यावर तुम्हीही हैराण व्हाल. चला जाणून घेऊ नासाने एलियन्ससोबत संपर्क करण्यासाठी काय प्लान केला आहे?
3 / 8
मनुष्य अनेक वर्षांपासून ब्रम्हांडात जीवनाचा शोध घेत आहेत. त्यासाठी जगातील अंतराळ संस्था अंतराळात सिग्नल पाठवतात. पण आता नासाने पृथ्वीकडे एलियन्सला आकर्षित करण्यासाठी अंतराळात मनुष्यांचे न्यूड फोटो पाठवण्याचा प्लान केला आहे.
4 / 8
नासाचा हा प्लान नक्कीच अजब आहे. पण हा एक अपडेट बायनरी कोड मेसेजचा भाग आहे. नासा या मेसेजचा एलियन्सला संपर्क करण्यासाठी वापर करेल. नासाचे वैज्ञानिक अनेक वर्षांपासून एलियन्ससोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत.
5 / 8
नासाच्या जेट प्रोपल्शन लेबॉरेटरीचे वैज्ञानिक डॉ. जोनाथन जियांग आणि त्यांच्या टीमने बायनरी कोड मेसेज तयार केला आहे. या मेसेजमध्ये एक न्यूड महिला आणि पुरूषाच्या फोटोसोबतच मॅथसंबंधी प्रश्न, डीएनए संरचना आणि सौर मंडळातील पृथ्वीसंबंधी माहितीचा समावेश आहे.
6 / 8
वैज्ञानिकांनी सांगितलं की, एक बायनरी कोडेड मेसेज तयार करण्यात आला आहे. जो मिल्की वे आकाशगंगेत एक मेसेज ट्रान्समिट करणार. ते म्हणाले की, तयार करण्यात आलेल्या मेसेजमध्ये मॅथचे प्रश्न आणि भौतिक नियमही आहेत.
7 / 8
वैज्ञानिकांनी सांगितलं की, पृथ्वीवरील जीवनाच्या जैव रासायनिक संरचनांची माहिती या मेसेजमध्ये दिली आहे. त्यासोबतच सौर मंडळाचे डिजीटल फोटो आणि पृथ्वीबाबत माहितीही दिली आहे.
8 / 8
ते म्हणाले की, या मेसेजमध्ये मनुष्यांचे डिजीटल फोटोही आहेत आणि मेसेज कसा परत पाठवायचा त्याची पद्धतही सांगितली आहे. जियांग आणि त्यांच्या टीमने प्रस्ताव दिला आहे की, हा मेसेज चीनमधील गुइझोईमधील टेलीस्टोप किंवा कॅलिफोर्नियातील SETI संस्थेतील एलन टेलीस्कोपने ट्रान्समीट करू शकतात.
टॅग्स :NASAनासाInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके