Natasha Poonawalla luxury life and interesting facts about her
ही आहे 'वॅक्सीनमॅन' अदर पूनावाला यांची पत्नी नताशा, जाणून घ्या तिच्याबाबत खास गोष्टी.... By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2021 2:04 PM1 / 11कोरोना महामारीला मुळातून नष्ट करण्यासाठी देशभरात वॅक्सीनेशन अभियान चालवलं जात आहे. यादरम्यान सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांची पत्नी नताशा पूनावाला यांनीही वॅक्सीन घेतली. त्यांनी इन्स्टाग्रामवर फोटोही शेअर केला. अदर पूनावाला यांची पत्नी नताशा पूनावाला या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या एक्झिक्युटीव डायरेक्टर आहेत. नताशा या बिझनेसवुमन असण्यासोबतच फॅशन आयकॉनही आहेत आणि इन्स्टाग्रामवर त्यांचे फोटो नेहमी चर्चेत राहतात. बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत आणि ब्रिटीश रॉयल्टींच्या त्या फार जवळ आहेत.2 / 11नताशा यांचा फॅशनमधील इंटरेस्ट ही काही नवीन बाब नाही. जगभरात लोक त्यांना एक फॅशनिस्टा या रूपात ओळखतात. एका मुलाखतीत नताशा यांनी सांगितले होते की, फेमस गायिका आणि गीतकार कॅटी पेरीही त्यांच्याकडून फॅशन टिप्स घेतात. नताशा पूनावाला म्हणाल्या होत्या की, 'कॅटी माझ्या संपर्कात होती. कारण तिला काही इंडियन आउटफिटची गरज होती.3 / 11नताशा सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या एक्झिक्युटीव डायरेक्टर असण्यासोबतच विलू पूनावाला फाउंडेशनच्या चेअरपर्सनही आहेत. त्या ब्रिटीश एशियन ट्रस्ट्स चिल्ड्रन्स प्रोटेक्शन फाउंड फॉर इंडियाच्याही चेअरपर्संन आहेत. चला जाणून घेऊ त्यांच्याबाबत काही खास गोष्टी....4 / 11पूनावाला यांच्या घरातील या सूनेचं संगोपन फार साध्या पद्धतीने झालं आहे. एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या की, 'मी फार लहान होते तेव्हा माझ्या आईने दुसरं लग्न केलं होतं. माझ्या सावत्र वडिलांचं माझ्यावर प्रेम होतं. अशाप्रकारे माझे तीन वडील झाले. माझे खरे पिता, सावत्र पिता आणि माझ्या आत्याचे पती'.5 / 11पूनावाला यांच्या घरातील या सूनेचं संगोपन फार साध्या पद्धतीने झालं आहे. एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या की, 'मी फार लहान होते तेव्हा माझ्या आईने दुसरं लग्न केलं होतं. माझ्या सावत्र वडिलांचं माझ्यावर प्रेम होतं. अशाप्रकारे माझे तीन वडील झाले. माझे खरे पिता, सावत्र पिता आणि माझ्या आत्याचे पती'.6 / 11नताशा आपल्या दोन्ही लेकरांच्या शिक्षणाबाबत फार सजग राहतात. त्या म्हणाल्या होत्या की, 'माझं संगोपन फार पारंपारिक पद्धतीने झालं होतं. पुणे मुंबई किंवा दिल्ली नाही आणि इथे सन्मान सर्वात महत्वाचा आहे. मी एक मायक्रो मॅनेजरही आहे. नुकतंच मला एक ग्लूटन फ्री वीगन मदर नाव देण्यात आलं आहे'.7 / 11प्रिन्स चार्ल्स यांनी ब्रिटीश एशियन ट्रस्ट्स चिल्ड्रन प्रोटेक्शन फाउंड फॉर इंडियाच्या चेअरपर्सनपदी नियुक्ती केल्यानंतर त्या म्हणाल्या होत्या की, 'आम्ही शिक्षण, हेल्थकेअर, सॅनिटायजेशन, चाइल्ड ट्रॅफिकिंग आणि चाइल्ड प्रोटेक्शन, लैंगिक अत्याचार क्षेत्रात काम करतो'.8 / 11'आमचं लक्ष नेहमीच येणाऱ्या पीढिचं आरोग्य, वॅक्सीनने जीवनाची सुरक्षा, शिक्षण आणि पर्यावरणाशी संबंधित मुद्द्यांवर राहिलं आहे. 9 / 11नताशा पूनावाला देशातील सर्वात शाही घर आणि संपत्तीच्या मालक आहे. पुण्यातील अदर आबाद पूनावाला हाउस आणि मोठं फार्महाउस यांचा यात समावेश आहे. सोबतच मुंबईत लक्झरी व्हिला आणि साउथ मुंबईत लिंकन हाऊसही लोकांचं लक्ष केंद्रीत करतं.10 / 11इकॉनॉमी टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, साउथ मुंबईचं लिंकन हाऊस पूनावाला यांनी २०१५ मध्ये ७५० कोटी रूपयांना खरेदी केलं होतं. अदर-नताशा यांच्याकडे लक्झरी कार्सही आहेत. त्यांच्याकडे फरारी, पॉर्श आणि रॉल्स रॉयससारख्या महागड्या कार आहेत.11 / 11इकॉनॉमी टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, साउथ मुंबईचं लिंकन हाऊस पूनावाला यांनी २०१५ मध्ये ७५० कोटी रूपयांना खरेदी केलं होतं. अदर-नताशा यांच्याकडे लक्झरी कार्सही आहेत. त्यांच्याकडे फरारी, पॉर्श आणि रॉल्स रॉयससारख्या महागड्या कार आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications