Navya Singh Brand Ambassador of Miss Transqueen India know her journey
वयाच्या १४व्या वर्षी त्याला समजलं तो पुरुष नाही महिला आहे, मग सुरु झाला ट्रान्स क्वीनचा प्रवास By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 11:43 AM1 / 13बिहारमधील (Bihar News) कटिहारमधील एका शीख कुटुंबात जन्मलेल्या मॉडेलचा प्रवास फार खडतर होता.2 / 13मॉडेल, अभिनेत्री आणि मिस ट्रान्सक्वीन इंडिया ब्युटी पेजेंट जिंकणाऱ्या नव्या सिंग या तरुणीने वयाच्या 14-15 व्या वर्षी आईला तिच्या शरीरात होणाऱ्या बदलाबाबत सांगितलं होतं. त्यावर तुला हवं असलेलं आयुष्य संघर्षाचं असल्याचं आईने सांगितलं होतं. मात्र तीदेखील मागे फिरली नाही.3 / 13अभिनेत्री सांगते, लहानपणी मुलाच्या जेंडर वरुन कोणीच बोलत नव्हतं. हळू हळू ती मोठी होऊ लागली. त्याचं वागणं मुलींसारखं होतं. त्यामुळे लोक तिची खिल्ली फडवत.4 / 13मला 12 व्या वर्षी वाटलं की, मी मुलगी आहे. आई-वडिलांसोबत कुठंही गेले की, लोक माझी खिल्ली उडवत. यामुळे माझ्या पालकांना खूप त्रास सहन करावा लागला.5 / 13मला आईचा पाठिंबा होता, मात्र वडिलांनी आधार दिला नाही. वडिलांमुळे वयाच्या१८ व्या वर्षी तो मुंबईला आला.6 / 13 मुंबईतील मावशीकडे राहत होता. येथपासून त्याची रिअल ट्रान्स वुमनचा प्रवास सुरू झाला. जी बाब १८ वर्षांपर्यंत माझ्या आई-वडिलांना कळाली नाही, ते माझ्या मावशीने १८ तासात ओळखलं. 7 / 13यानंतर मावशी त्याला घेऊन NGO आणि डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी मावशीला सांगितलं की, हा चुकीच्या शरीरात आहे. त्याला स्त्री म्हणून जगू द्या. यामुळे त्याचं जगणं सोपं होईल.8 / 13डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर हार्मोन्स थेरेपी सुरू केली. यामुळे बदल होऊ लागला आणि मी हळू हळू स्त्री होऊ लागले. 9 / 13डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर हार्मोन्स थेरेपी सुरू केली. यामुळे बदल होऊ लागला आणि मी हळू हळू स्त्री होऊ लागले. 10 / 13यादरम्यान एकदा आई-वडील मुंबईला आले. दोघांचंही समुपदेशन झाले. डॉक्टरांच्या खोलीतून बाहेर आल्यानंतर वडिलांच्या डोळ्यात पश्चाताप होता. त्यांनी रडत रडतच मला मिठी मारल्याचं मॉडेल सांगते.11 / 13यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. तिला 2016 मध्ये इंडियाच्या लीडिंग मॅगजीनमध्ये मॉडेल म्हणून पहिल्यांदाच काम मिळालं होतं. त्यानंतर सावधान इंडियामध्ये ट्रान्स वुमेन मोनाचा लीड रोल मिळाला.12 / 13२०१७ मध्ये मिस ट्रांसक्वीन इंडिया ब्यूटी पीजेंटबद्दल कळालं आणि त्याचं ऑडिशन दिलं. या पीजेंटमध्ये सहभागी झाले. त्यांनी मला मिस ट्रांसक्वीनचं ब्रँड एम्बेसडर बनवलं.13 / 13नव्या म्हणते, ट्रान्सफॉर्मेशन झाल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा घरी आले तर मला पाहण्यासाठी गावातील लोक जमा झाले होते. गावात नवीन नवरी आल्याप्रमाणे लोकांना बघण्यासाठी रांग लावली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications