Nazi photo album made out of human hair and skin found at antiques market api
मनुष्यांच्या चामड्या अन् केसांपासून फोटो अल्बम, इतकी क्रूर होती हिटलरची सेना! By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2020 3:33 PM1 / 10हिटलर आणि त्याची सेना किती क्रूर होती हे नेहमीच जगासमोर येत असतं. त्यांच्या क्रूरतेचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. नाझी सेनेने मनुष्याच्या चामड्यापासून एक फोटोचा अल्बम तयार केला होता. हा अल्बम तयार करण्यासाठी मनुष्याच्या चामड्यासोबतच त्यांच्या केसांचाही वापर करण्यात आला होता. हा अल्बम पोलंडच्या एका अॅंटीक बाजारात आढळून आलाय.2 / 10मनुष्याच्या चामड्यापासून तयार केलेला हा अल्बम आता ऑस्चविट्स मेमोरिअल म्युझिअमकडे सोपवण्यात आला आहे. हा अल्बम पोलंडच्या एका जुन्या बाजारात सापडला.3 / 10असेही सांगितले जात आहे की, मनुष्याच्या त्वचेपासून तयार हा फोटो अल्बम जर्मनीच्या बचेनवाल्ड येथील नाझी कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये मारल्या गेलेल्या ज्यू लोकांच्या त्वचेपासून हा फोटो अल्बम तयार केला गेला होता.4 / 10ऑस्चविट्ज मेमोरिअल म्युझिअमच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, जेव्हा त्यांना हा अल्बम मिळाला तेव्हा त्यात टॅटू, केस आणि मनुष्याच्या चामड्याची दुर्गंधी येत होती. याची तपासणी केली तेव्हा याचे ठोस पुरावे मिळाले की, हा फोटो अल्बम मनुष्यांच्या त्वचेपासून तयार केला आहे.5 / 10१९३७ मध्ये हिटलरच्या नाझी सेनेकडून तयार केलेल्या कंसेन्ट्रेशन कॅम्पमध्ये लोकांवर अत्याचार केले जात होते. असेही सांगितले जाते की, या कॅम्पमध्ये जे ज्यू लोक गेले ते जिवंत परत आले नाहीत.6 / 10या कॅम्पचा अधिकारी कार्ल ओट्टो हा होता. पण कॅम्पमध्ये ज्यू लोकांच्या मृत्यूचं कारण त्याची पत्नी इल्से कोच ही होती. इल्से कोच पुरूष ज्यू कैद्यांना यातना देत होती.7 / 10इल्से कोच ज्यू पुरूष कैद्यांच्या शरीरावर एक विशेष प्रकारचा टॅटू बनवत होती. नंतर त्यांचं चामडं काढून त्यापासून वेगवेगळ्या डिझाइनचे अल्बम तयार करण्यासाठी देत होती. खालील फोटोत मनुष्यांची त्वचा, टॅटू आणि मनुष्यांची कवटी, फुप्फुसं दिसत आहेत.8 / 10इतकेच नाही तर इल्से कोच या मनुष्यांच्या चामड्यापासून लॅंपशेड, टेबल कव्हर इत्यादी गोष्टीही तयार करून घेत होती. दुसऱ्या महायुद्धानंतर इल्से कोच विरोधात कोर्टात खटलाही चालवला गेला. 9 / 10त्यावेळी तिने सांगितले होते की, ती नाझी डॉक्टर एरिक वॅग्नर यांनी जमा केलेल्या मनुष्यांच्या चामड्यावर पीएचडी थेसीस लिहित होती.10 / 10इल्से कोच ने सांगितले होते की, एरिक वॅग्नेरने १०० पेक्षा जास्त मनुष्यांच्या त्वचेपासून तयार अनेक वस्तू तिला गिफ्ट केल्या होत्या. इल्से कोच हिला 'द बिच ऑफ बचेनवाल्ड' असंही म्हटलं जात होतं. इल्से या खटल्यातून निर्दोष सुटली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications