neelakurinji flowers strobilanthes kunthiana bloom once in 12 years idukki kerala
Neelakurinji Flowers : तब्बल 12 वर्षांनी फुलली नीलकुरिंजी! By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2021 4:25 PM1 / 12भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत, तेथील नैसर्गिक सौंदर्य लोकांना आपल्याकडे आकर्षित करते. उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत भारत नैसर्गिक सौंदर्यासाठी जगप्रसिद्ध आहे. देशात अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत, तेथील सुंदर दृश्य लोकांना मोहित करते. असाच काहीसा दक्षिण भारतातील केरळ राज्याच्या जंगलात सापडलेल्या नीलकुरिंजी फुलांचा इतिहास आहे.2 / 12नीलकुरिंजी नावाचे फूल जगातील अनेक दुर्मीळ फुलांपैकी एक आहे. विशेष म्हणजे नीलकुरिंजीची फुले 12 वर्षांतून एकदा फुलतात. या फुलांचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांना 12 वर्षे वाट पाहावी लागते.3 / 12केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील संथानपारा पंचायत अंतर्गत शालोम टेकड्यांवर नीलकुरिंजीची फुले पुन्हा एकदा फुलली आहेत. ही फुले दक्षिण भारतातील केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यांच्या शोला जंगलांचे नैसर्गिक सौंदर्य वाढवतात.4 / 12रिपोर्टनुसार, नीलकुरिंजी ही स्ट्रोबिलेंथेसची विविधता आहे आणि ती एक मोनोकार्पिक वनस्पती आहे. ही एक अशी वनस्पती आहे जी कोमेजून केल्यानंतरनंतर पुन्हा फुलण्यास 12 वर्षे लागतात. सहसा नीलकुरिंजीची फुले ऑगस्ट महिन्यापासून फुलण्यास सुरुवात होतात आणि ऑक्टोबर पर्यंत टिकतात.5 / 12रिपोर्टनुसार, नीलकुरिंजी ही स्ट्रोबिलेंथेसची विविधता आहे आणि ती एक मोनोकार्पिक वनस्पती आहे. ही एक अशी वनस्पती आहे जी कोमेजून केल्यानंतरनंतर पुन्हा फुलण्यास 12 वर्षे लागतात. सहसा नीलकुरिंजीची फुले ऑगस्ट महिन्यापासून फुलण्यास सुरुवात होतात आणि ऑक्टोबर पर्यंत टिकतात.6 / 12स्ट्रोबिलेंथेस कुन्थियानाला मल्याळी आणि तामिळमध्ये नीलकुरिंजी आणि कुरिंजी म्हणून ओळखले जाते. ही फुले भारतातील कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू राज्यांच्या शोला नावाच्या जंगलांमध्ये फक्त उंच पर्वतांवर आढळतात.7 / 12नीलकुरिंजी फुले केवळ केरळच्या सौंदर्यात भर घालत नाहीत तर तेथील पर्यटन व्यवसायालाही चालना देतात. ही फुले पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने येथे येतात. या फुलांचे सौंदर्य पाहण्यासाठी लोक लाखो रुपये खर्च करून केरळला जातात.8 / 12मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी 10 एकराहून अधिक नीलकुरिंजी फुलांनी शालोमकुन्नू झाकले आहे. मात्र, यंदा कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता पर्यटकांना येथे येण्यास मनाई करण्यात आली आहे9 / 12इडुक्की येथील रहिवासी बिनू पॉल, जे इडुक्कीच्या जैवविविधतेवर सखोल अभ्यास करतात. ते म्हणाले, यंदा कोरोनामुळे पर्यटकांना या टेकड्यांना भेट देण्याची परवानगी देण्यात आली नाही. स्ट्रोबिलेंथेस कुंथियाना म्हणून ओळखले जाणारे नीलकुरिंजीचे फूल इडुक्कीच्या लोकांसाठी मोठे महत्त्व आहे. परंतु अशा समृद्ध जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी देखील प्रयत्न केले पाहिजेत.10 / 12रिपोर्टनुसार, तमिळनाडूच्या सीमेला लागून असलेल्या पश्चिम घाटातील अनाकारा मेट्टू डोंगर, थोंडीमालाजवळील पुट्टडी आणि शांतनपुरा ग्रामपंचायतीच्या सीमेला लागून असलेल्या गावात 12 वर्षांनंतर नीलकुरिंजी फुले फुलतात.11 / 12पश्चिम घाटच्या विविध प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या ऋृतूमध्ये अनेक फुलांना बहर येते. या फुलांना बहर आल्यानंतर 12 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर नीलकुरिंजी या फुलांना बहर येतो.12 / 12पश्चिम घाटच्या विविध प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या ऋृतूमध्ये अनेक फुलांना बहर येते. या फुलांना बहर आल्यानंतर 12 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर नीलकुरिंजी या फुलांना बहर येतो. आणखी वाचा Subscribe to Notifications