new delhi railway station new executive lounge looks like five star hotel
एअपोर्ट वेटिंग एरिया नाही, आलिशान फाईव्ह स्टार हॉटेलही नव्हे हे तर रेल्वेस्टेशन, कोणते? घ्या जाणून By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 6:37 PM1 / 10अनेकदा आपण मोठा प्रवास करून जेव्हा रेल्वे स्टेशनवर उतरतो, तेव्हा आपल्याला इच्छित स्थळी जाण्यापूर्वी थोडं फ्रेश व्हावंसं वाटतं. कुठेतरी अंघोळीची आणि गरमागरम नाश्त्याची सोय झाली, तर किती बरं होईल, असा विचार मनात येतो. 2 / 10मनातला हा विचार आता दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर पूर्ण होणार आहे. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर (New Delhi Railway Station) आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धर्तीवर अलिशान लाऊंज (Lounge) तयार करण्यात आलं आहे.3 / 10IRCTC च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय विमानतळाप्रमाणेच दिल्ली रेल्वे स्टेशनवरील लाऊंज तयार करण्यात आले आहे.4 / 10प्रवास सुरु करण्यापूर्वी आणि प्रवास संपल्यानंतर याचा वापर प्रवाशांना करता येणार आहे.5 / 10पहिलं पॅकेज १५० रुपये अधिक जीएसटी असं आहे. त्यात तुम्हाला १ तास लाऊंजमध्ये थांबण्याची सुविधा मिळेल. त्या दरम्यान तुम्ही वायफायचाही उपयोग करू शकता. त्याचप्रमाणे चहा, कॉफी आणि कोल्ड्रिंक्स कॉम्पिमेंटरी स्वरुपात दिले जाणार आहेत.6 / 10इथं प्रवाशांना चॅलन म्युझिकची सुविधा पुरवण्यात आली आहे. या ठिकाणी वायफाय, वर्तमानपत्र आणि मासिकं यांचा आनंद पर्यटक घेऊ शकतील.7 / 10विमातळावर ज्याप्रमाणे विमानांचे तपशील दिसतात, त्याचप्रमाणे लाऊंजमधून प्रवाशांना त्यांच्या रेल्वेच्या येण्याजाण्याच्या सूचना मिळू शकणार आहेत. या ठिकाणी आरामखुर्च्या आणि रिक्लायनर्स लावण्यात आले आहेत.8 / 10नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म नंबर १ वरील पहिल्या मजल्यावर हा अलिशान लाऊंज तयार करण्यात आला आहे.9 / 10या लाऊंजमध्ये बिझनेस सेंटरही उभारण्यात आलं आहे. लाऊंजमधील प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.10 / 10 तिकीट असलेला कुठलाही प्रवासी याचा वापर करू शकतो. आणखी वाचा Subscribe to Notifications