New photo of mars surfaced you won't believe your eyes after seeing these pics
Mars Photo : मंगळ ग्रहाचे अवाक् करणारे फोटो आले समोर, बघून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास! By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 6:22 PM1 / 6Mars Grand Canyon Pictures: लोक अनेक वर्षांपासून विचार करत आहेत की, मंगळ ग्रह मनुष्यांच्या राहण्यायोग्य ग्रह होऊ शकतो. अंतराळ एजन्सींनी लाल ग्रहावर पाणीही शोधून काढलं आहे. पण अजूनही हे समजू शकलेलं नाही की, मंगळ ग्रहावर जीवन शक्य आहे की नाही. अशात यूरोपिय अंतराळ एजन्सी ईएसएने मंगळ ग्रहावरील ग्रॅंड कॅन्यनचे फोटो जारी केले आहेत. हे फोटो निश्चितपणे तुम्हाला अवाक् करतील. मंगळ ग्रहावरील ग्रॅंड कॅन्यनच्या या थक्क करणाऱ्या फोटोंमध्ये लाल ग्रहाचा चमकदार रंग आणि सुंदर मैदान दिसतं.2 / 6ही जवळपास ८ हजार मीटर लांब टॅफ आहे जे वॅलेस मेरिनरिसच्या सर्वात उत्तरेला आहे. जे ३ हजार किलोमीटर लांब मंगळ ग्रहाचं ग्रॅन्ड कॅन्यन आहे. याचं नाव मंगळ ग्रहाचं ग्रॅंड कॅन्यन यासाठी ठेवलं कारण हे अमेरिकेतील ग्रॅंड कॅन्यनशी मिळतं जुळतं आहे.3 / 6मंगळ ग्रहाच्या ग्रॅन्ड कॅन्यनच्या फोटोंमध्ये लाल ग्रहाचा भाग स्पष्टपणे दिसत आहे. म्हटलं असंही जात आहे की, इथे जल खनिज उपलब्ध आहे.4 / 6मंगळ ग्रहाच्या ग्रॅन्ड कॅन्यनच्या मधोमध एक सपाट उंच डोंगर आहे. कदाचित हा एका पुन्या पठाराचा अवशेष असू शकतो किंवा ज्वालामुखीमुळे हा तयार झाला असेल.5 / 6मंगळ ग्रहावरून सतत वैज्ञानिकांना आणि लोकांना हैराण करणारे फोटो समोर येत आहेत. याआधीही मंगळ ग्रहावरील दगडांचे फोटो समोर आले होते. ग्रॅन्ड कॅन्यनच्या डोंगरांबाबत म्हटलं जात आहे की, हे ज्वालामुखी किंवा मग जल खनिज द्वारे निर्मित असू शकतात.6 / 6याचे पुरावे सापडले आहेत की, ग्रॅन्ड कॅन्यनवर पाणी आहे. ओएमईजीए स्पेक्ट्रोमीटर ऑन-बोर्ड मार्स एक्सप्रेसच्या डेटानुसार, काही भागांमध्ये जिप्समसारख्या पाण्याचा प्रभाव असलेल्या खनिजाबाबत समजलं आहे. यावरून हे स्पष्ट होतं की, कधीतरी इथे पाणी उपलब्ध होतं. (All Photo Credit - ESA) आणखी वाचा Subscribe to Notifications