शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मिठी आणि चुंबनासाठी केवळ 3 मिनिटांची वेळ, एअरपोर्टच्या नव्या नियमाने 'या' देशात गदारोळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 4:35 PM

1 / 6
New Zealand airport rules : न्यूझीलॅंड विमानतळावरील नियमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. येथील विमानतळाने त्यांच्या ड्रॉप-ऑफ एरिया (म्हणजे जिथे लोक आपल्या नातेवाईकांना सोडायला येतात) मध्ये कुटुंबिय किंवा मित्रांना सोडायला येणाऱ्यांसाठी एक अजब नियम बनवला आहे.
2 / 6
एअरपोर्टच्या प्रशासनाने पॅंसेजर्सना बाय करण्यासाठी आणि मिठी मारण्यासाठी एक ठराविक वेळ ठरवली आहे. नव्या नियमानुसार, तुम्ही कोणत्याही व्यक्तीला तिथे सोडण्यासाठी आले असाल तर त्यांच्यासोबत तुम्हाला जास्तीत जास्त 3 मिनिटे म्हणजे 90 सेकंदाची वेळ मिळेल.
3 / 6
न्यूझीलॅंडच्या ड्यूनडिन एअरपोर्टने आपल्या ड्रॉपऑफ झोनमध्ये गळाभेट घेण्यासाठी 3 मिनिटांची वेळ ठरवली आहे. त्यासाठी एक बोर्डही लावला आहे. बोर्डवर लिहिण्यात आलं आहे की, कृपया तुमच्या आप्तांवर प्रेम कार किंवा पार्किंगमध्ये व्यक्त करा. पण इथे तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबू नका.
4 / 6
एअरपोर्टच्या सीईओने सांगितलं की, 20 सेकंदाचं आलिंगन 'लव हॉर्मोन' ऑक्सीटोसिनच्या विस्फोटासाठी खूप आहे.
5 / 6
आता 3 मिनिटांच्या या नियमावरून सोशल मीडियावर वाद पेटला आहे. कुणी याला कमी तर कुणी जास्त वेळ म्हणत आहे. भडकलेल्या लोकांचं म्हणणं आहे की, एअरपोर्ट अथॉरिटी कशी हग आणि किस करण्याची वेळ ठरू शकते? तर अधिकारी म्हणाले की, या नियमाचं पालन न करणाऱ्यांवर पोलीस कारवाई केली जाईल.
6 / 6
सोमवारपासून हा नियम लागू करण्यात आला आहे. आता प्रशासनाच्या नियमावर लोक प्रश्न उपस्थित करत आहेत. प्रशासनाने सांगितलं की, तुम्ही एअरपोर्ट पार्किंगमध्ये आप्तांना बाय करा. प्रेम करा, मीठी मारा. तिथे जास्त जागा आहे. तसेच पार्किंग एरियामध्ये 15 मिनिटांची फ्री भेटीची परवानगी आहे.
टॅग्स :New Zealandन्यूझीलंडJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल