शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बहिणीच्या सासरी गेला होता भाऊ, तिथे असं काही घडलं की चक्क बहीण-भावाचं लग्न लावून देण्यात आलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 4:10 PM

1 / 10
बिहारच्या भागलपूरमधून लग्नाची एक अजब घटना समोर आली आहे. इथे बहिणीला भेटायला तिच्या सासरी गेलेल्या भावाचं बहिणीसोबतच तिच्या सासरच्या लोकांनी लग्न लावून दिलं. म्हणजे भावाचं बहिणीसोबत लग्न लावून दिलं.
2 / 10
ही घटना आहे भागलपूरची. इथे भावा-बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली. इथे एका तरूणीचं लग्न १७ मे रोजी दुसऱ्या गावातील एका शेतकरी तरूणासोबत झालं होतं.
3 / 10
मंगळवारी मुलीचा भाऊ तिला भेटायला तिच्या सासरी आला. बहिणीने भावाला नाश्ता दिला, दोघांनी गप्पा मारल्या. त्यानंतर तिने रूमचा दरवाजा बंद केला.
4 / 10
सासरच्या लोकांना जेव्हा संशय आला तर त्यांनी रूममध्ये लपून पाहिलं. त्यावेळी दोघेही आक्षेपार्ह स्थितीत दिसले. यादरम्यान मुलीच्या सासरच्या लोकांनी त्यांचा व्हिडीओ काढला आणि फोटोही काढले.
5 / 10
सासरच्या लोकांनी दोघांनाही याबाबत जाब विचारला तर दोघे काहीच उत्तर देऊ शकले नाही. परिस्थिती बिघडत असल्याची दिसताच मुलगी भावासोबत आपल्या माहेरी जाण्यासाठी तयार झाली. तर सासरचे लोक यावर भडकले.
6 / 10
सासरच्या लोकांनी सूनेला अशा आदेश दिला की, तिला धक्काच बसला. ते म्हणाले की, जोपर्यंत तुझा भाऊ तुझ्या भांगेत कुंकू भरत नाही, तोपर्यंत तुम्हा दोघांना इथून जाऊ दिलं जाणार नाही.
7 / 10
तरूणालाही हे सांगण्यात आलं की, जोपर्यंत तुमचं लग्न होत नाही तोपर्यंत तुम्ही इथून जाऊ शकत नाही. हे ऐकताच दोघेही हैराण झाले. अखेर भावाने बहिणीला कुंकू लावलं आणि तिच्यासोबत लग्न केलं.
8 / 10
या घटनेचा खुलासा झाला तेव्हा सगळेच हैराण झाले. दोघांनाही धमकी दिली गेली की, जर तुम्ही दोघांनी लग्न केलं नाही तर तुमचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल केले जातील. व्हिडीओ सर्वांना दाखवला जाईल.
9 / 10
त्यानंतर अखेर भाऊ बहिणीला घेऊन घरी गेला. जेव्हा तरूणाला घरातील लोकांनी याबाबत विचारले तर त्याने काहीही बोलण्यास नकार दिला.
10 / 10
नंतर दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ मुलीच्या सासरच्या लोकांनी रेकॉर्ड केला होता. त्यांनीच तो नंतर व्हायरल केला. या घटनेबाबत मुलीच्या सासरच्या लोकांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
टॅग्स :Biharबिहारmarriageलग्नJara hatkeजरा हटके