शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अरे बाप रे बाप! नीता अंबानी पितात जगातलं सर्वात महाग पाणी, एक घोटाची किंमत वाचून चक्रावून जाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2021 6:32 PM

1 / 5
आजच्या दिवसात श्रीमंतीचं दुसरं नाव अंबानी आहे. अंबानी परिवाराकडे इतका पैसा आहे की, त्यांच्या एका पाण्याच्या घोटाची किंमतही लाखो रूपये असते. हे गमतीत घेऊ नका. कारण हे आम्ही तुम्हाला पुराव्यासहीत सांगणार आहोत. नीता अंबानी तीन लाख रूपयांच्या कपात चहा पितात ही बाब तर सर्वांनाच माहीत आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, नीता अंबानी किती महागडं पाणी पितात.
2 / 5
मीडिया रिपोर्टनुसार, अंबानी परिवाराची सून आणि बिझनेसवुमन नीता अंबानी जगातलं सर्वात महागडं पाणी पितात. ७५० मिली इतकं पाणी असलेल्या बॉटलची किंमत साधारण ६० हजार डॉलर इतकी आहे. भारतीय करन्सीनुसार, ७५० मिलीच्या या पाण्याच्या बॉटलची किंमत ४४ लाख रूपयांपेक्षा अधिक आहे.
3 / 5
नीता अंबानी या स्वत:ला हेल्दी ठेवण्यासाठी 'Acqua di Cristallo Tributo a Modigliani' च्या बॉटलने पाणी पितात. ही जगातल्या सर्वात महागड्या बॉटलपैकी एक आहे. ही बॉटल सोन्यापासून बनलेली असते. या बॉटलमध्ये असलेलं पाणी हे फ्रान्स किंवा फिजीमधील असतं. असं म्हणतात की, या पाण्यात ५ ग्रॅम सोन्याचा भस्मही मिश्रित केला जातो. जे मनुष्याच्या शरीरासाठी फार फायदेशीर असतं. बस याच कारणाने या बॉटलची किंमत इतकी जास्त आहे.
4 / 5
२०१० मध्ये 'Acqua di Cristallo Tributo a Modigliani' चं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमद्ये सर्वात महागडं पाणी म्हणून नोंदवलं गेलं होतं. बॉटलचं डिझाइन Fernando Altamirano ने तयार केलं आहे. हा तोच डिझायनर आहे ज्याने जगातली सर्वात महागडी बॉटल 'Cognac Dudognon Heritage Henri IV' चं डिझाइन केलं आहे.
5 / 5
बॉटल जेवढी सुंदर आहे, त्यापेक्षा जास्त सुंदर त्याचं लेदर पॅकेजिंग आहे. या ब्रॅंडची सर्वात स्वस्त बॉटलची किंमत २८५ डॉलर म्हणजे २१ हजार ३५५ रूपये इतकी आहे. बघितलं ना नीता अंबानी या पितात त्या पाण्याचा एक घोटही किती महाग आहे.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेnita ambaniनीता अंबानी