North Korea leader Kim Jong Un father and grandfather dead bodies safe in kumsusan memorial palace
'या' हुकूमशहाने अजूनही सांभाळून ठेवले आहेत वडील आणि आजोबांचे मृतदेह, शेकडो जवान करतात सुरक्षा By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 4:40 PM1 / 5उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन सगळ्यांनाच माहीत आहे. आपल्या देशात घातक हत्यार तयार करण्यावरून तो नेहमीच चर्चेत असतो. तसे तर उत्तर कोरियातील अनेक विचित्र कायदे तुम्हाला माहीत असतीलच. पण तुम्हाला हे वाचून जास्त आश्चर्य वाटेल की, किम जोंग उनने त्याच्या वडिलांचा आणि आजोबांचा मृतदेह अजूनही सुरक्षित ठेवला आहे. 2 / 5मीडिया रिपोर्ट्सनुसार, किम जोंग उनचे वडील किम जोंग इल आणि आजोबा किम जोंग इल सुंग यांचे मृतदेह कुमसुसन मेमोरिअल पॅलेसमध्ये सांभाळून ठेवण्यात आले आहेत. हा पॅलेस खासकरून या दोन नेत्यांचे मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी तयार करण्यात आला आहे. इथे असा रिवाज आहे की, कुमसुसन पॅलेसच्या जवळ जाणाऱ्या प्रवाशांना या मृतदेहांसमोर तीन वेळा वाकावं लागतं.3 / 5कुमसुसन मेमोरीअल पॅलेसच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र शेकडो जवान तैनात असतात. इथे ठेवण्यात आलेल्या किम जोंग उनच्या वडिलांच्या आणि आजोबांच्या मृतदेहांची देखरेखीचं काम रशियातील लेनिन लॅब करते. लेनिन लॅबमधील वैज्ञानिकांच्या टीमनेच या नेत्यांचे मृतदेह संरक्षित करून ठेवले आहेत. याच लॅबच्या वैज्ञानिकांनी १९२४ मध्ये रशियन नेते ब्लादिमीर लेनिन यांच्या मृतदेहाचं एम्बामिंग केली होती. 4 / 5एम्बामिंगच्या माध्यमातून मृतदेहांना लवचिक आणि त्वचेला तरूण ठेवलं जातं. मृतदेहांच्या एम्बामिंगसाठी अनेक महिन्यांचा कालावधी लागू शकतो. याच प्रक्रियेच्या माध्यमातून किम जोंग उनचे वडील आणि त्याचे आजोबा यांचे मृतदेह संरक्षित करण्यात आले आहेत.5 / 5किम जोंगच्या वडिलांचा आणि आजोबांचा मृतदेह दर दोन वर्षांनी एम्बामिंग केले जातात. २०१६ मध्ये मॉस्कोमध्ये रिलीज करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार, या नेत्यांच्या मृतदेहांच्या पहिल्या एम्बामिंगमद्ये साधारण २ लाख डॉलर म्हणजे १ कोटी ४१ लाख रूपये खर्च आला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications