शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हुकूमशहाची अशीही मुजोरी! किम जोंग उनच्या वडिलाने चक्क दुश्मन देशातील अभिनेत्रीला केलं होतं किडनॅप...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2020 1:28 PM

1 / 9
जेव्हाही नॉर्थ कोरियाचा उल्लेख येतो तेव्हा विचित्र गोष्टींसाठीच अधिक होतो. सध्याचा हुकूमशहा किम जोंग उनने इथे कठोर नियम केले आहेत याची नेहमीच चर्चा होत असते. पण केवळ किम जोंग उनच वादग्रस्त नाही तर त्याचे वडील किम जोंग इल सुद्धा फार वादग्रस्त व्यक्तिमत्व होते. ते फार तापट स्वभावाचे आणि रंगीन होते. कमी वयाच्या मुलींसोबत राहणं त्याला आवडत होतं. त्यासाठी एक प्लेजर क्स्वाड तयार केला होता. ज्यातील काह निवडक मुली त्यांची सेवा करत होत्या. या शौकीन हुकूमशहाला सिनेमे बघण्याचीही आवड होती. आपल्या देशात चांगले सिनेमे बनत नसल्याचं नेहमी त्याला वाईट वाटत होतं. त्यामुळे किम जोंग इलने साउथ कोरियाची लोकप्रिय अभिनेत्री Choi Eun-hee ला चक्क किडनॅप केलं होतं आणि तिने तिथे नंतर सव्वा दोन वर्षात 17 सिनेमांमध्ये काम केले होते.
2 / 9
ही घटना आहे 1978 मधील. त्यावेळी साउथ कोरियन सिनेमाचा गोल्डन काळ सुरू होता. एकापेक्षा चांगले सिनेमे तयार होत होते. Choi Eun-hee ही त्याच काळातील टॉपची अभिनेत्री होती. ती साठ ते सत्तरच्या दशकात लोकप्रिय होती. या अभिनेत्रीचे पती Shin Jeong-gyun सिनेमे बनवत होते. एकूण काय तर हे कपल सेलिब्रिटी होतं. पण नंतर एका ज्यूनिअर अभिनेत्रीमुळे दोघांमध्ये दुरावा आला.
3 / 9
यादरम्यान अभिनेत्री Choi Eun-hee ला हॉंगकॉंगमध्ये एका बिझनेस डीलसाठी बोलवण्यात आलं होतं. अभिनेत्री तिथे पोहोचली आणि इथूनच तिचं अपहरण करण्यात आलं. स्पीडबोटने तिला राजा किम जोंग इलकडे नेण्यात आलं. तेव्हा अभिनेत्रीच्या लक्षात आलं की, हॉंगकॉंग बिझनेस डील केवळ एक नाटक होतं.
4 / 9
नॉर्थ कोरियात तिला असं ठेवण्यात आलं जसं तिला अपहरण करून नाही तर तिच्या मर्जीने आणलं असावं. किम जोंग इल फोटो काढताना तिला म्हणायचे की, आमच्या देशात येण्यासाठी धन्यवाद. याचा उल्लेख स्वत: अपहरण करण्यात आलेल्या अभिनेत्रीने The Lovers and the Despot या डॉक्युमेंट्रीत केला.
5 / 9
त्यावेळी किम जोंग इलचे वडील प्रेसिडेंट होते आणि किम जोंग इल Propaganda and Agitation Department मिनिस्ट्री बघत होता. सिनेमांचा शौक असणाऱ्या किमने 30 हजारांपेक्षा अधिक सिनेमे जमा केले. ज्यातील जास्तीत जास्त पॉर्नही होते. आपल्या देशातही सिनेमे तयार व्हावे म्हणून त्याने दुश्मन देशातील अभिनेत्रीचं अपहरण केलं.
6 / 9
अभिनेत्रीनुसार, किमला वाटत होतं की, नॉर्थ कोरियातील सिनेमांनाही इंटरनॅशलन स्टेजवर बघितलं जावं. यासाठी त्याने अभिनेत्रीच काय तर तिच्या डायरेक्टर पतीलाही उचलून आणलं. डायरेक्टरने नंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याला पकडून प्रिजन कॅम्पमध्ये टाकण्यात आलं.
7 / 9
पती-पत्नी दोघांनाही हे माहीत नव्हतं की, त्यांना एकाच देशाच्या व्यक्तींच्या म्हणण्यावर किडनॅप करण्यात आलं होतं. त्यांना टीव्ही बघणे, पेपर वाचणे किंवा बाहेरील कुणास भेटण्याची परवानगी नव्हती. पाच वर्ष डायरेक्टरला शिक्षा म्हणून कॅम्पमध्ये ठेवण्यात आलं होतं. नंतर नॉर्थ कोरियासाठी सिनेमे करण्याच्या अटीवरच त्याला सोडण्यात आले.
8 / 9
The Lovers and the Despot दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितले की, 2 वर्षे 3 महिन्यात दोघांनी मिळून 17 सिनेमे केलेत. किमचा आदेश होते की, रात्री तीन तासांपेक्षा अधिक झोपू नये आणि सतत काम करावं. तेव्हाच त्यांना जिवंत ठेवलं जाईल. किमच्या सांगण्यानुसार, सिनेमांमध्ये शारीरिक संबंधाची दृश्येही होती. जी त्यावेळी नॉर्थ कोरियातील सिनेमात नव्हती.
9 / 9
1986 मध्ये यूरोपियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये किमने दोघांना नॉर्थ कोरियाचे प्रतिनिधी म्हणून पाठवले. त्यांच्यावर सतत पाळत ठेवली जात होती. इतकेच काय तर रूममध्येही गार्ड असायचे. पण कसेतरी दोघे तेथून पळाले आणि अमेरिकेत शरण घेतली. तिथे ते 1998 पर्यंत राहिले आणि त्यानंतर त्यांच्या देशात म्हणजे साउथ कोरियात परतले.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सnorth koreaउत्तर कोरियाKim Jong Unकिम जोंग उन