The oldest water on earth found, know how it's taste
इथे सापडलं जगातलं सर्वात जुनं पाणी; १६० कोटी वर्षाआधीचं रहस्य उलगडणार, कशी आहे या पाण्याची टेस्ट? By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 1:25 PM1 / 10जगातलं सर्वात जुनं पाणी शोधण्यात आलं आहे. हे १६० कोटी वर्ष जुनं आहे. आणि हे शोधलंय टोरांटो यूनिव्हर्सिटीतील आयसोटोप जियोकेमिस्ट्रीच्या बारबरा शेरवुड लोलर यांनी. हे पाणी कॅनडा सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी म्युझिअममध्ये सांभाळून ठेवण्यात आलं आहे. चला जाणून घेऊ कुठे सापडलं हे पाणी? कशी आहे त्याची चव?2 / 10बारबरा शेरवुडने आपल्या टीमच्या दोन सदस्यांच्या माध्यमातून कॅनडातील एका खाणीतून पाणी जमा केलं आहे. त्यानंतर हे पाणी ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीमध्ये टेस्टसाठी पाठवलं. अनेक दिवस उत्तर आलं नाही तर बारबराने ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीच्या लॅबमध्ये फोन लावून विचारले की, या सॅम्लचं काय झालं. लॅबमधील टेक्नीशिअनने गंमतीत उत्तर दिलं की, आमचं मास स्पेक्ट्रोमीटर तुटलं आहे. हे इतकं जुनं आहे की, आम्हाला जोडायला वेळ लागेल. 3 / 10पाण्याचं हे सॅम्पल कॅनडातील ओंटारिओमधून उत्तरेतील टिमिंस नावाच्या ठिकाणी असलेल्या खाणीत सापडलं. पाण्याचं हे सॅम्पल १६० कोटी वर्ष आहे. हे पृथ्वीवरील आतापर्यंतचं सर्वात जुनं पाणी आहे. बारबराला हे समजल्यावर आश्चर्य वाटलं की, तिने पृथ्वीवरील सर्वात जुनं पाणी शोधलं आहे. बारबरा सांगते की, या पाण्यातून हे समजू शकतं की, सौर मंडळातील इतर ग्रहांवर जीवन कधी होतं की नाही. (Image Credit : Getty Images)4 / 10बारबराने सांगितले की, या पाण्याचा शिळं असल्यासारखा वास येतो. या वासावरून आम्हाला हे समजलं की, पाणी दगडांच्या मधे डिस्चार्ज होत आहे. या पाण्याची टेस्ट फार खारट आहे. हे पाणी समुद्रातील पाण्यापेक्षा १० पट जास्त खारट आहे. बारबरा शेरवुड म्हणाल्या की, पहिल्यांदा टिमिंसला १९९२ मध्ये गेली होती. तेव्हा त्या किड्ड क्रीक खाणीत गेल्या होत्या.5 / 10१९९२ च्या प्रवासानंतर त्यांची टीम आणि त्या १७ वर्षांनंतर पुन्हा एकदा खाणीत २.४ किलोमीटरपर्यंत गेल्या. त्यानंतर चार वर्षापर्यंत सॅम्पल कलेक्ट केले. त्यांच्या टेस्ट केल्या. बारबरा म्हणाल्या की, आम्ही पाण्याला केवळ H2O च्या रूपात ओळखतो. पण याचा कधी विचार करत नाही की, यात आणखी काय काय आहे. १६० कोटी वर्ष जुन्या या पाण्यातून रेडिओजेनिक नोबल गॅसेस जसे की, हीलियम आणि जेनॉन मिळालं.6 / 10किड्ड खाणीत मिळालेल्या १६० वर्ष जुन्या पाण्यात इंजीनियम नावाचं तत्व आहे. सध्य पाण्याचं हे सॅम्पल ओटावातील कॅनडा सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी म्युझिअममध्ये ठेवलं आहे. त्यासोबतच या पाण्यात कोमोलिथोट्रोफिक मायक्रोब्सही आहे. ज्यामुळे पाण्याचा रंग थोडा पिवळा झाला आहे. हे मायक्रोब्स हायड्रोजन आणि सल्फेट खाऊन जिवंत आहे. (Image Credit : Getty Images)7 / 10बारबरा यांनी सांगितले की, आजही किड्ड खाणीतून तांबे आणि झिंकचं काढलं जातं. ही जगातली सर्वात खोल खाण आहे. ही साधारण तीन किलोमीटर खोल आहे. काही ठिकाणी खोली अधिक जास्त आहे. पण ते अंतर अजून मोजलेलं नाही. या खाणीत आत जायला साधारण १ तासाचा वेळ लागतो. तिथे जाण्यासाठी दोन मजल्याची लिफ्ट आणि त्यानंतर १.५ किलोमीटर लांब बॅटरी पावर्ड ट्रेनमध्ये प्रवास करावा लागतो. (Image Credit : Getty Images)8 / 10बारबरा यांनी सांगितले की, आत गेल्यावर भीतींना तुम्ही स्पर्श केल्यावर उष्णता जाणवते. इतकंच काय तर आत वाहणारं पाणीही २५ डिग्री सेल्सिअस गरम असतं. ही खाण १९६३ मध्ये सुरू झाली होती. तेव्हापासून इथे अनेक प्रयोगही झाले आहेत. (Image Credit : Getty Images)9 / 10बारबरा यांनी सांगितले की, आत गेल्यावर भीतींना तुम्ही स्पर्श केल्यावर उष्णता जाणवते. इतकंच काय तर आत वाहणारं पाणीही २५ डिग्री सेल्सिअस गरम असतं. ही खाण १९६३ मध्ये सुरू झाली होती. तेव्हापासून इथे अनेक प्रयोगही झाले आहेत. (Image Credit : Getty Images)10 / 10बारबरा यांनी सांगितले की, आत गेल्यावर भीतींना तुम्ही स्पर्श केल्यावर उष्णता जाणवते. इतकंच काय तर आत वाहणारं पाणीही २५ डिग्री सेल्सिअस गरम असतं. ही खाण १९६३ मध्ये सुरू झाली होती. तेव्हापासून इथे अनेक प्रयोगही झाले आहेत. (Image Credit : Getty Images) आणखी वाचा Subscribe to Notifications