मुलाखतीत एक चूक अन् कंपनीनं ऑफर केली डबल सॅलरी; महिलेला कसा झाला आर्थिक फायदा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 12:42 IST
1 / 10नोकरीसाठी मुलाखत देणं सोपे नसते, तुम्ही ज्या कंपनीत मुलाखतीसाठी जात आहात, तिथल्या वरिष्ठांवर तुम्हाला प्रभाव पाडावा लागतो परंतु त्यासोबतच तुम्हाला तुमची किंमत ओळखणेही गरजेचे असते. 2 / 10सर्वात महत्त्वाचं असते, ती म्हणजे तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला पगार मिळायला हवा. सोशल मीडियावर असाच काहीचा अनुभव लोक शेअर करत असतात. एका महिलेनेही तिला आलेला अनुभव सांगितला. मुलाखतीवेळी ठरवलेल्या पगारापेक्षा दुप्पट पगाराची तिने मागणी केली. त्यानंतर पुढे काय घडलं हे जाणून घ्या3 / 10 सोशल मीडियावर ही घटना शेअर करत एका महिलेने सांगितले की, तिने मुलाखतीत दुप्पट पगाराची मागणी कशी केली कारण भरतीच्या प्रक्रियेदरम्यान नोकरीच्या जाहिरातीत एक महत्त्वाची गोष्ट लपवून ठेवली होती.4 / 10इंग्रजी वेबसाईट मिररच्या रिपोर्टनुसार, न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या या महिलेला मार्केटिंग क्षेत्रातील दिर्घ काळाचा अनुभव गाठिशी आहे. तिला स्वत:ची क्षमताही ठाऊक आहे. अनेक वर्षे तिने हाय प्रेशरच्या वातावरणात काम केले आहे. 5 / 10आयुष्याच्या अशा वळणावर ही महिला पोहचली आहे की तिला आता थांबायचे आहे. त्यासाठी ती अशा नोकरीच्या शोधात होती जिथे तिला चांगल्या पगारात आणि कमी तणावाखाली काम करता येईल. त्यासाठी तिने शोधाशोध सुरू केली.6 / 10एकेदिवशी तिला तिच्या आवडीच्या नोकरीची जाहिरात सापडली. त्याठिकाणी या महिलेने अर्ज दाखल केला. परंतु मुलाखतीवेळी तिच्या कामाचा भाग म्हणून इंटरनॅशनल टूरचाही समावेश असल्याचं तिला कळाले. तेव्हा तिने हजरजबाबीपणे मुलाखतीत उत्तर दिले.7 / 10प्रवासावेळी मी जो वेळ घालवणार, त्यासाठी प्रतितास सॅलरी काहीच नाही म्हणजे जर मी कंपनीला ८ तास देत असेन तर प्रवासामुळे माझा दुप्पट वेळ खर्च होणार, परंतु कंपनी त्या प्रमाणे सॅलरी देत नाही त्यामुळे मला डबल पगार हवा असं महिलेने सांगितले.8 / 10मुलाखत घेणाऱ्यांनी या महिलेला थेट सांगितले, कॉर्पोरेट जगतात असं काही नसते, तुम्ही प्रॅक्टिकल बोलत नाही त्यावर महिलेने स्पष्टपणे तुम्ही तुमच्या भरतीच्या जाहिरातीत खोटं सांगितले आहे असं उत्तर दिले.9 / 10या महिलेने सोशल मीडियात सांगितले की, माझ्याकडे माझ्या क्षेत्राचा दशकांचा अनुभव आहे. मी अशा नोकरीच्या शोधात होती, जिथे कमी तणाव असेल. माझी आर्थिक परिस्थिती बिकट नाही. ना पती, ना मुले, ना मोठं घर ना घराचे भाडे, ना कार...या नोकरीत पगारात कपात नाही परंतु तणाव कमी होता, परंतु कामाचा भाग वेगळाच होता. 10 / 10मला वाटलं होतं माझ्या स्पष्टवक्तेपणामुळे मला ही नोकरी मिळणार नाही. परंतु कंपनीला माझा स्पष्टपणा भावला. त्यासाठी त्यांनी मला नोकरी देण्याचा निर्णय घेतला. तीदेखील दुप्पट पगारासह..जे तुमच्यासाठी योग्य आहे. या प्रकारे मला नवीन जॉब मिळाला असं महिलेने सांगितले.