शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' गावात महिलाच राहतात, पुरुषांना बंदी; १८ व्या वर्षानंतर आई मुलालाही सोडते

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2023 10:00 AM

1 / 10
A Place For Women, By Women… उत्तर केनियाच्या सैमबुरी काऊंटी इथं उमोजा गावात याचीच प्रचिती मिळते. हे एक असं गाव आहे जिथं केवळ महिलाच राहतात. बऱ्याच प्रमाणात हे आदिवासी खेड्यासारखे गाव दिसते परंतु एक फरक म्हणजे याठिकाणी पुरुषच नाही.
2 / 10
उमोजा स्वाहिली भाषेतील एक शब्द आहे. ज्याचा वापर एकतेसाठी केला जातो. ज्याचा उद्देश या समुदायाचे मूळ आहे. १९९० मध्ये लिंग आधारित झालेल्या हिंसेतून वाचून महिलांना एक सुरक्षित ठिकाणी वास्तव्य केले. उमोजा गावात आज सर्व वयोगटातील महिलांचे घर आहे.
3 / 10
मुली आणि महिलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी या गावात पुरुषांना प्रवेश बंदी आहे. उमोजामध्ये बहुतेक अशा महिला राहतात ज्यांनी लैंगिक हिंसाचार आणि अत्याचाराचा अनुभव घेतला आहे, ज्यांना त्यांच्या कुटुंबांनी सोडून दिले आहे.
4 / 10
२०१७ मध्ये फोटोग्राफर पॉल निन्सनने या गावाचे फोटो काढण्यासाठी केनियाला जाण्याचा निर्णय घेतला. महिलांशी संपर्क नसल्यामुळे तो सतत प्रवासात भटकत असे. त्याला फक्त गावाचे नाव माहिती होते. उमोजाचे पहिले काही सदस्य सांबुरू गावातील होते.
5 / 10
जरी ही संख्या बदलत असली तरी, सर्वात मोठ्या प्रमाणात या आत्मनिर्भर गावात महिला आणि त्यांची मुले असलेली सुमारे ५० कुटुंबे होती. हे गाव आपल्या रहिवासी महिलांच्या हक्कांबद्दल आणि लिंग-आधारित हिंसाचाराबद्दल सतत शिक्षित करते.
6 / 10
महिलांच्या कोणत्याही मुलाला १८ वर्षे वयापर्यंत गावात राहण्याची परवानगी आहे. पॉल निन्सन यांनी सांगितले की, या गावात पोहोचणे खूप कठीण होते आणि त्यांच्या भेटीचा उद्देश समजल्यानंतरच महिलांनी त्यांना गावात प्रवेश दिला.
7 / 10
या गावात पुरुषांना बंदी आहे. याठिकाणी कोणत्याही पुरुषाने प्रवेश केल्यास त्याची माहिती स्थानिक पोलिसांना दिली जाते. त्यानंतर त्या माणसाला पुन्हा या गावात प्रवेश न करण्याची ताकीद पोलिसांकडून आणि या महिलांकडून दिली जाते.
8 / 10
हे गाव १९९० मध्ये १५ महिलांच्या गटाकडून सुरू करण्यात आले. या महिलांवर ब्रिटीश सैनिकांनी सांबुरु आणि इसिओसो जवळील व्यापारी सीमेच्या परिसरात बलात्कार केला होता. ज्यानंतर या महिलांना समाजाकडून द्वेषाने पाहिले गेले, जणू काही ही त्यांची चूक आहे. त्यानंतर हे गाव वसले.
9 / 10
हळूहळू हे गाव आश्रयस्थानात बदलले. येथे घराबाहेर टाकलेल्या सर्व महिलांचे स्वागत केले जाते. वैवाहिक जीवनात अडचणीत आलेल्या, स्त्री विच्छेदनाने पीडित महिला, बलात्कार आणि इतर गुन्ह्यांमुळे पीडित महिला येथे येतात.
10 / 10
उमोजा गावातील महिला पूर्ण स्वातंत्र्याने आनंदाने राहतात. त्यांना येथे कोणत्याही कामासाठी परवानगी घेण्याची गरज नाही. या गावातील महिला रंगीबेरंगी मोत्यांच्या माळा बनवतात, पारंपारिक ज्वेलरी बनवतात त्यावरून त्यांचा उदरनिर्वाह चालतो.
टॅग्स :Womenमहिला