शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बोंबला! घरामागच्या विहिरीत अडकला हा लठ्ठ माणूस, १२ लोक मिळूनही काढू शकले नाही बाहेर!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 4:11 PM

1 / 6
लठ्ठपणाला शंभर आजारांचं कारण मानलं जातं. लठ्ठपणामुळे व्यक्तीला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. आता चीनमधील या व्यक्तीचंच उदाहरण बघा. हे महाशय त्यांच्या घरामागील कोरड्या विहिरीला बुजवण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांना काय माहीत होतं की, ते विहिरीत फसतील आणि त्यांना काढं कठिण होईल. ही व्यक्ती त्याच्या लठ्ठपणामुळे विहिरीच्या तोंडावर अडकून पडली
2 / 6
नंतर त्याचा जीव वाचवण्यासाठी फायर ब्रिगेडची टीम आली. त्यांनी या व्यक्तीला दोराच्या मदतीने काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यात फारसं यश मिळालं नाही. १२५ किलो वजनाची ही व्यक्ती जागेवरून जराही हलली नाही. त्यानंतर आणखी जरा प्लॅनिंग करून या व्यक्तीच रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं.
3 / 6
ही घटना आहे चीनची. इथे एक व्यक्ती त्याच्या घरामागील कोरड्या पडलेल्या विहिरीत पडला. त्यानंतर यातून त्याने बाहेर निघण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो विहिरीच्या तोंडावर येऊन अडकला. १२५ किलो वजन असलेल्या या व्यक्तीचं नाव लिउ के आहे. तो कोरडी पडलेली विहीर बुजवण्याचा प्रयत्न करत होता. अचानक त्यावेळी ही घटना घडली आणि तो विहिरीत अडकला.
4 / 6
२८ वर्षीय लिउला बाहेर काढण्यासाठी १२ लोकांची रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली. त्यांनी दोरी बांधून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना फारसं यश मिळालं नाही. उलट तो अधिक आत अडकला होता.
5 / 6
सोशल मीडिया पोस्टनुसार, लुओयांग फायर ब्रिगेडने जेव्हा लिउला विहिरीत पाहिले तेव्हा त्याचं अर्ध शरीर विहिरीच्या आत आणि अर्ध बाहेर बाहेर होतं. इतकेच नाही तर त्याने कपडेही घातले नव्हते. हात बांधून तो त्याला कुणीतरी बाहेर काढेल याची वाट बघत होता.
6 / 6
लिउ हा विहिरीत कचरा आणि लाकडांनी भरत होता. अचानक त्याचा बॅलन्स गेला आणि तो त्यात पडला. अखेर १२ लोकांच्या टीमने आणि गावातील काही लोकांच्या मदतीने लिउला दोराने चांगलं बांधलं आणि त्यानंतर विहिरीचा थोडा थोडा भाग तोडून त्याला बाहेर खेचलं. याचे फोटो व्हायरल झाले आहेत.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलchinaचीन