पाकिस्तानातून प्रेमासाठी भारतात आलेल्या सीमाचं असं होतं आयुष्य, वाचून व्हाल हैराण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 12:33 IST
1 / 9Seema Haider Sachin Love Story : सध्या सोशल मीडियावर पाकिस्तानातील सीमा हैदर चांगलीच चर्चेत आहे. प्रियकर सचिन मीणासोबत राहण्यासाठी सीमा पाकिस्तान सोडून नेपाळ मार्गे चार मुलांना घेऊन भारतात आली. 2 / 9सचिनसोबत ती पहिल्यांदा मार्चमध्ये नेपाळच्या काठमांडूमध्ये भेटली. दोघांची मैत्री PUBG गेमिंग अॅपवर झाली होती. पण ही कहाणी इतकीच नाही. सीमाच्या आयुष्यात हे काही पहिलं प्रेम नव्हतं. चला जाणून घेऊ सीमाचं आयुष्य...3 / 9सचिन आणि सीमा दोघेही 2019 मध्ये ऑनलाइन गेम पब्जीच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आले आणि शेवटी पाकिस्तानी महिला सीमा आपला देश सोडून ग्रेटर नोएडामध्ये सचिनसोबत राहू लागली. आता सीमाने सचिनसोबत लग्न केलं आहे.4 / 9भारतात आल्यावर सीमाला अटकही झाली होती. सध्या सीमा जामिनावर बाहेर आहे आणि मीडियात चर्चेत आहे. पण प्रश्न हा आहे की, सचिन सीमाचं पहिलं प्रेम आहे का? तर याचं उत्तर नाही असं आहे. हे समोर आलं आहे की, सीमा गुलाम हैदर नावाच्या व्यक्तीची पत्नी आहे. पण गुलामसोबत लग्न होण्याआधीही तिची एक वेगळी प्रेम कहाणी आहे.5 / 9सीमाने स्वत: सांगितलं की, गुलामसोबत लग्न करण्याआधी पाकिस्तानमध्ये ती दुसऱ्यावर प्रेम करत होती. मुलाखतीत सीमा म्हणाली की, पाकिस्तानात गुलामसोबत लग्न करण्याआधी ती दुसऱ्या तरूणावर प्रेम करत होती.6 / 9सीमाच्या परिवाराला जेव्हा तिच्या प्रेमाची खबर लागली तेव्हा ते नाराज झाले. त्यानंतर नाराज परिवाराने तिचं लग्न जबरदस्ती गुलाम हैदरसोबत लावून दिलं. सीमाने असाही खुलासा केला की, कोर्ट मॅरेजदरम्यान तिच्याकडून जबरदस्ती साइन करून घेण्यात आली. 7 / 9सीमा म्हणाली की, 'आमच्याकडे जर तुम्ही प्रेमात पडला तर त्याला इज्जत घालवली असं मानलं जातं. माझ्या पहिल्या लग्नातून मला दोन मुलं आहेत आणि दोन वर्षापासून ते सोबत नाहीत. 8 / 9सीमाने मुलाखतीत सांगितलं की, तिचे आई-वडील वारले आहेत. तिच्या परिवारात एक भाऊ आणि एक बहीण आहे. ज्यांच्यासाठी ती ओझं ठरली. सीमा म्हणाली की, गुलामला हे सहन होत नाहीये. जबरदस्ती कोणतंही नातं चालत नसतं. गुलाम माझ्यासोबत बरोबर राहत नाही. जर त्याने माझा सन्मान केला असता तर मी भारतात आले नसते.9 / 9सीमाने मुलाखतीत सांगितलं की, तिच्या आणि गुलामच्या मुलांना तिच्या वडिलांना सांभाळलं. मुलं कधीच गुलामला बाबा म्हणत नव्हते. माझे वडिलच माझ्या मुलांचे बाबा होते. त्यांनीच त्यांचा सांभाळ केला. केवळ पैसे महत्वाचे नसतात, सन्मानही महत्वाचा आहे. गुलाम मला फोनवरही वाईट बोलत होता. सोबत राहत होतो तेव्हा भांडणं होत होती.