Parsi community crematoriums dokhmenashini system and ritual
काय आणि कशी आहे पारसी समाजातील अंत्यसंस्काराची पद्धत? ज्यावर सरकारने घातली आहे बंदी By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 12:48 PM1 / 8पारसी पद्धतीने अंत्य संस्काराच्या याचिकेवर सुनावणी करत सुप्रीम कोर्टाने टॉवर ऑफ सायलेन्सवरील बंदी सध्या हटवण्यास नकार दिला आहे. पारसी समुदायातील लोक बऱ्याच काळापासून मागणी करत आहेत की, त्यांना कोरोनात जीव गमावलेल्या नातेवाईकांवर आमच्या परंपरेनुसार अंत्य संस्कार करण्याची परवानगी मिळावी. पारसी पद्धतीत मृतदेहांना दफन करण्यावर किंवा अग्नी देण्यावर बंदी आहे.2 / 8केंद्र सरकारने अंत्य संस्कारासाठी जारी केलेल्या SoP ला बदलण्यास नकार देत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत सांगितलं होतं की, Covid-19 संक्रमणाने मृत्यू झाल्यावर अंत्य संस्काराचं काम प्रोफेशनल्सकडून केलं जातं. मृत शरीराला अशाप्रकारे मोकळं सोडलं जाऊ शकत नाही, जसं की, पारसी धर्मात केलं जातं.3 / 8कसा केला जातो पारसी लोकांमध्ये अंत्य संस्कार? - जन्म झाल्यावर मृत्यू हा होणारच कारण ही एक प्रक्रिया आहे. मृत्यू झाल्यानंतर अंत्य संस्कार हे प्रत्येक धर्मात वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात. सामान्य सिनेमांमध्ये एकच पद्धत ठोबळपणे दाखवली जाते. दोन प्रकारे अंत्यसंस्कार केले जातात. एक म्हणजे दफन केलं जातं नाही तर अग्नी दिलं जाते. हे हिंदू किंवा मुस्लिम धर्मात केलं जातं. पण पारसी लोकांमध्ये अंत्यसंस्काराची एक वेगळी प्रथा आहे. पारसी लोकांमध्ये व्यक्तीच्या पार्थिवाला ना दफन करतात ना अग्नी देतात. यासाठी त्यांची एक वेगळीच प्रथा आहे. 4 / 8पारसी हा बराच जुना धर्म आहे आणि या धर्मात ३ हजार वर्षांपासूनच्या वेगवेगळ्या प्रथा आजही पाळल्या जातात. पारसी समाजात अंत्यसंस्काराच्या प्रथेला 'दोखमेनाशिनी' असे म्हणतात. व्यक्तीचं निधन झालं की, मृत व्यक्तीचं शरीर 'दोखमेनाशिनी' साठी शरीर एकांतात नेलं जातं. आणि इथे ते व्यक्तीच्या मृत शरीराला गिधाडांसाठी सोडतात. 5 / 8भारतात पारसी लोक हे मुंबई शहरात सर्वात जास्त राहतात. मुंबईत पारसी लोकांची स्वतंत्र स्मशान भूमी आहे. या स्मशानभूमीला 'टॉवर ऑफ साइलेन्स' असं म्हटलं जातं. इथे मृत शरीराला आणून ठेवले जातं आणि मग गिधाड येऊन ते शरीर खातात. त्यांच्या मते असं केल्यावरच त्यांना मुक्ती मिळते. पण आता ही स्मशानभूमी बंद करण्यात आली आहे.6 / 8पूर्वी ही स्मशान भूमी अत्यंत शांत भागात असायची. पण शहरीकरणाने आता पूर्वीची शांतता राहिली नाही. तसेच गिधाड व इतर पक्षी अर्धवट मृत्यदेह खात असल्याने त्यांची दुर्गंधी येते. त्यामुळे जवळपास च्या रहिवाशी लोकांनी पण याला विरोध केला. तसेच गिधाडांची संख्याही आता कमी झाली. 7 / 8त्यामुळे पारसी समाजाच्या अंत्यविधीला अडचणी निर्माण होतात. कारण गिधाड हा पक्षी आता लुप्त होतोय. आजच्या घडीला गिधाडांची संख्या अत्यंत कमी झाली आहे २००७ मध्ये १०० च्या कमीच गिधाड राहिले आहेत, अशी नोंद होती. त्यामुळे पारसी समाजात सध्या अंत्यविधी साठी वेगळा पर्याय शोधावा लागतो आहे. आता अंत्यविधीसाठी पारसी लोकांना सुरतला जावं लागतं. आता गिधाड नामशेष झाल्याने पारशी धर्मियांना अंत्यविधीसाठी थेट गुजरातमधील सुरत गाठावे लागते. निसर्गाचे जीवनचक्र बदलल्याने पारशी समाजबांधवांना प्रेतासह चारशे किलोमीटर लांबीच्या अंत्ययात्रेचा प्रवास करावा लागतो. स्वतंत्र प्राप्तीनंतर शहराच्या व्यावसायिक क्षेत्रात अव्वल असलेल्या पारशी धर्मियांना मुंबईत हक्काची स्मशानभूमी आहे. मात्र, असे असतानाही त्यांना तेथे अंत्यसंस्कार करता येत नाहीत.8 / 8काही लोक हे स्पष्टपणे म्हणतात की, पारसी लोकांची ही अंत्यसंस्काराची प्रथा आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. तर पारसी सिद्धांतवाद्यांचं असं मत आहे की, ते याशिवाय दुसरी कोणतीही प्रथा स्विकारू शकत नाहीत. प्रथा बदलण्याबाबत अनेक पारसी लोक सहमत नाहीत. त्यामुळे त्यांना दुसऱ्या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी जावं लागतं. आणखी वाचा Subscribe to Notifications