People are buying this ripped bodysuit to avoid going to the gym in lockdown
घरी बसल्या बसल्या सुटलं होतं पोट; पठ्ठ्यानं बॉडी सूट लावून मिळवले सिक्स पॅक्स; वाचा ही भानगड आहे तरी काय? By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 6:20 PM1 / 7कोरोना व्हायरसमुळे घरी थांबण्याव्यतिरिक्त लोकांकडे कोणताही पर्याय नाही. शारीरिक हालचाल कमी झाल्यामळे लोकांना वजन वाढून लठ्ठपणाच्या समस्येचा सामना कराव लागत आहे. त्यातल्या त्यात जीम बंद असल्यामळे अनेकांच्या शरीरयष्टीवर नकारात्मक परिणाम झालेला पाहायला मिळत आहे आपल्या लठ्ठ शरीराला लपवण्यासाठी तसंच आकर्षक दिसण्यासाठी लोकांनी एक आयडिया शोधून काढली आहे. यामुळे फक्त लठ्ठपणा कमी होत नाही तर एखाद्या बॉलीवूड सेलिब्रिटीप्रमाणे शरीर दिसतं. 2 / 7जर तुम्ही पोस्ट लॉकडाऊन वजन वाढण्याच्या समस्येनं हैराण असाल तर काही महिन्यांसाठी बेढब शरीर लपवायचं असल्यास तुम्ही बॉडीसूटचा वापर करू शकता. तुम्हाला फूल आणि हाफ अशा दोन्ही स्वरूपात बॉडी सूट उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे तुम्हाला एक आकर्षक लूक मिळेल.3 / 7Taobao... ही अश्याप्रकारच्या सुटची विक्री करणारी कंपनी आहे. हा सूट घातल्यानंतर काही वेळातच तुमचं शरीर एकदम फिट असल्याप्रमाणे दिसू लागेल. 4 / 7बाजारात आणि ऑनलाईनसुद्धा वेगवेगळ्या आकाराचे रिप्ड सुट उपलब्ध आहेत. यामुळे तुमचं सुटलेलं शरीर तुम्हाला लपवता येऊ शकतं. यामुळे परफेक्ट बॉडी शेप तुम्हाला मिळतो. 5 / 7हा बॉडी सूट घालणं खूप सोपं आहे. एखाद्या टि शर्टप्रमाणे हा बॉडी सुट तुम्ही घालू शकता. 6 / 7या बॉडी सुटची किंमत १५ हजार ६८१ रूपये असल्याचं सांगितलं जात आहे. 7 / 7हा सुट घातला म्हणजे आपण फिट झालो असं अजिबात नाही. रोज व्यायाम, योगा यांसह निरोगी आहार घेऊनच तुम्ही निरोगी राहू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications