People buying coal cow dung cake sale online due to cold
बाबो! थंडी वाढताच ऑनलाईन विकला जातोय कोळसा; १० हजार रूपयांना लोक घेताहेत ब्रँण्डेड कोळसा By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 2:05 PM1 / 8भारतात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पडायला सुरूवात झाली आहे. काही प्रदेशात स्वटेर आणि जॅकेट असूनही या थंडीपासून बचाव होत नाहीये. थंडीपासून बचावसाठी लोक वेगवेगळ्या उपायांचा वापर करत आहेत. बाजारातील मागणी पाहता आता ऑनलाईन साईट्सवर कोळसा मोठ्या प्रमाणावर विकला जात आहे. 2 / 8ऑनलाईन बाजारात तुम्ही किलोने कोळसा घेऊ शकता. तुमचा विश्वास बसणार नाही पण आपल्या गरजेनुसार लोक घरबसल्या कोळसा ऑर्डर करत आहेत. कोरोनाकाळात अशी मार्केटिंग स्ट्रेटजी पाहून सगळेचजण चकीत झाले आहेत. 3 / 8भारतात शितलहरी वाढत आहेत. पर्वतीय प्रदेशात बर्फ पडत आहे. म्हणून लोक थंडीपासून बचावासाठी वेगवेगळ्या उपायांचा अवलंब करत आहेत. थंडीपासून बचावासाठी लोक लाकूडाच्या शेकोटीचा वापर करत आहेत.4 / 8गाव, खेड्याच्या भागात तुम्ही कोळसा जळताना पाहिला असेल. बाजारातून कोळसा विकून घेऊन लोक गोणी भरून न्यायचे. आता सगळं काही डिजिटल झाल्यामुळे कोळसाही लोक ऑनलाईन विकत घेत आहेत. 5 / 8गाव, खेड्याच्या भागात तुम्ही कोळसा जळताना पाहिला असेल. बाजारातून कोळसा विकून घेऊन लोक गोणी भरून न्यायचे. आता सगळं काही डिजिटल झाल्यामुळे कोळसाही लोक ऑनलाईन विकत घेत आहेत. 6 / 8अनेक वेबसाईड्वर कोळसा विकला जात आहे, ज्या ठिकाणी तुम्ही ऑर्डर करू शकता. कमी धूर आणि जास्तवेळ जळणारा कोळसा अधिक दराने विकला जात आहे. याशिवाय शेणाच्या गोवर्यासुद्धा ऑनलाईन विकल्या जात आहेत. ऑनलाईन सेलसुद्धा लावण्यात आला आहे. 7 / 8वेगवेगळ्या कंपनीने कोळश्याच्या किमती वेगवेगळ्या निश्चित केल्या आहेत. काही वेबसाईड्वर कोळसा ३० रूपये प्रति किलो आहे तर काही वेबसाईड्वर १९९ रूपये प्रती किलोनेही उपलब्ध आहे. 8 / 8अॅमेझॉनवर १० हजार रुपयांपासून कोळश्याची विक्री सुरू होत असून जो कोळसा लगेच जळतो किंवा कमी धूर निर्माण करतोय असा कोळसा जास्त प्रमाणात विकला जात आहे. या कोळश्याला रेटींगसुद्धा जास्त आहे. लोक जास्तप्रमाणात या कोळश्याची खरेदी करत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications