कुणी सिंह पाळलाय, तर कुणी मगर... ह्यांचं घर म्हणजे 'मिनी जंगल' By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 3:46 PM
1 / 6 पाळीव प्राणी म्हटलं की डोळ्यासमोर काही विशिष्ट प्राणी येतात. कोणते प्राणी पाळीव आणि कोणते प्राणी जंगली, याबद्दल आपल्या मनात काही स्पष्ट विचार असतात. मात्र काही माणसं आणि त्यांच्या आवडीच अत्यंत हटके असतात. त्यामुळे त्यांचे 'पाळीव' प्राणीदेखील लक्ष वेधून घेतात. 2 / 6 इंडोनेशियातल्या एका तरुणानं चक्क मगर पाळली आहे. या मगरीसोबत हा तरुण सकाळ-संध्याकाळ रस्त्यावर, बागेत फिरायलादेखील जातो. 3 / 6 इजिप्तमधल्या एका तरुणीनं चक्क सिंह पाळला आहे. ही तरुणी प्राण्यांना प्रशिक्षण देण्याचं काम करतं. 4 / 6 अजगर म्हटलं की अनेकांना धडकी भरते. मात्र मेक्सिकोतल्या फर्नांडो ऑर्टिझनं चक्क अजगर पाळला आहे. 5 / 6 तुम्ही अनेकांच्या घरात पोपट पाहिले असतील. मात्र मॅनाग्वात राहणाऱ्या हॅझल क्वांटनं पाळलेला पोपट साध्या पोपटांपेक्षा अतिशय मोठा आहे. तिनं या पोपटाचं नाव लोला असं ठेवलंय. 6 / 6 पॅलेस्टाईनमधल्या एका तरुणानं त्याच्या घरात अनेक कासवं पाळली आहेत. त्यानं पाळलेली ही कासवं अनेकांसाठी कुतूहलाचा विषय आहेत. आणखी वाचा