माणसांप्रमाणेच प्राण्यांवरदेखील केले जातात 'असे' उपचार By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2018 3:23 PM
1 / 5 तुर्कस्तानच्या इस्तांबूलमध्ये एका खारीवर उपचार करण्यात आले. या खारीला चालता येत नव्हतं. त्यामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. 2 / 5 ब्राझीलच्या सोरोकाबा प्राणीसंग्रहालयातील एका फ्लेमिंगोच्या पायाचं हाड मोडलं. त्याच्या पायावर तेथील डॉक्टरांनी उपचार केले. 3 / 5 आठ महिन्यांची मांजर नवव्या मजल्यावर पाचव्या मजल्यावर पडल्यानं तिचे मागचे दोन्ही पाय निकामी झाले. त्यामुळे मांजराला चालता येणं शक्य होतं नव्हतं. त्यामुळे तिच्या शरीराच्या मागच्या भागाला, पायांजवळ दोन चाकं लावण्यात आली. 4 / 5 व्हर्जिनियातील अँजेल मेरी या तीन वर्षीय घोडीचा पुढील एक पाय निकामी झाला. त्यामुळे तिच्यावर उपचार करुन कृत्रिम पाय बसवण्यात आले. 5 / 5 यॉर्कशायरमध्ये राहणाऱ्या होप नावाच्या कुत्र्याच्या पुढील पायाजवळ चाक लावण्यात आलं आहे. पायामध्ये ताकद असल्यानं होपसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. आणखी वाचा