शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Places Where Sun Never Sets : जगभरातील 'ही' सहा ठिकाणं, जिथं होत नाही सूर्यास्त!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2021 12:47 PM

1 / 7
दिवस संपल्यानंतर सूर्यास्त होणार हे निश्चित आहे. परंतु कधीकधी आपण विचार करतो की, सूर्यास्त नसल्यास किती चांगले होईल. पण तसे होणे अशक्य आहे. जगभरात अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथे वर्षातील अनेक दिवस सूर्यास्त होत नाही. यावर विश्वास ठेवणे थोडे कठीण आहे, पण हे खरे आहे की, जगात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे रात्र होत नाही. या ठिकाणांची माहिती पुढील प्रमाणे...
2 / 7
नॉर्वे- नॉर्वे आर्क्टिक सर्कलमध्ये येतो. या देशाला लँड ऑफ मिडनाइट असेही म्हटले जाते. येथे मे ते जुलै दरम्यान सुमारे 76 दिवस सूर्य मावळत नाही. नॉर्वेच्या स्वालबार्डमध्ये 10 एप्रिल ते 23 ऑगस्टपर्यंत सूर्याचा प्रकाश सतत असतो.
3 / 7
नुनावत, कॅनडा- नुनावत हे कॅनडामधील एक छोटे शहर आहे. कॅनडाच्या या वायव्य भागात जवळजवळ दोन महिने सूर्याचा नेहमी प्रकाश असतो. तर हिवाळ्यात हे ठिकाणी सलग 30 दिवस पूर्णपणे रात्र असते.
4 / 7
आइसलँड - ग्रेट ब्रिटननंतर हे युरोपमधील सर्वात मोठे बेट आहे. येथे जून महिन्यात सूर्यास्त होत नाही. याठिकाणी तुम्ही मध्यरात्रीसुद्धा सूर्यप्रकाशाचा आनंद घेऊ शकता.
5 / 7
बॅरो, अलास्का - मे महिन्याच्या उत्तरार्ध ते जुलैच्या अखेरीस येथे सूर्य मावळत नाही. परंतु नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून, पुढील 30 दिवसांसाठी येथे रात्र होते. याला पोलर नाईट असेही म्हणतात. हे ठिकाण बर्फाच्छादित पर्वत आणि सुंदर हिमनद्यांसाठी जगप्रसिद्ध आहे.
6 / 7
फिनलँड - हजारो तलाव आणि बेटांनी सजलेला हा देश अतिशय सुंदर आहे. उन्हाळ्याच्या हंगामात सूर्याचा येथे सुमारे 73 दिवस प्रकाश असतो. याठिकाणी तुम्हाला नॉर्दर्न लाइट्सचा आनंद घेण्याची संधी मिळते. याशिवाय, तुम्ही फिनलँडमध्ये स्कीइंगला जाऊ शकता तसेच काचेच्या इग्लूमध्ये राहण्याचा अनुभव घेऊ शकता.
7 / 7
स्वीडन - याठिकाणी मे ते ऑगस्टपर्यंत सूर्य मध्यरात्री मावळतो आणि नंतर पहाटे 4:30 पर्यंत सूर्योदय होतो. येथे सूर्याचा 6 महिने सतत प्रकाश असतो. त्यामुळे लोक येथे अनेक दिवस गोल्फिंग, मासेमारी, ट्रेकिंग ट्रेल्स आणि अनेक साहसी उपक्रम करू शकतात.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेTravel Tipsट्रॅव्हल टिप्स