शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अबबब! 9 कोटी रूपयांना विकलं गेलं हे लाल स्वेटर, जाणून घ्या याची खासियत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 1:45 PM

1 / 9
काही दिवसातच थंडीला सुरूवात होणार आहे आणि या दिवसात स्वेटरची डिमांड चांगलीच वाढते. बाजारात स्वस्त व महागडी स्वेटर सहज मिळतात. पण तुम्ही कधी 9 कोटी रूपये किंमत असलेलं स्वेटर पाहिलं नसेल. यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण एका लाल स्टेटरला लिलावात 9 कोटी रूपये किंमत मिळाली आहे.
2 / 9
एकतर हे स्वेटर जुनं आहे आणि दुसरी बाब म्हणजे ते दिसायलाही इतर स्वेटरसारखं सामान्य दिसत आहे. पण मग याची इतकी किंमत का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. चला जाणून घेऊ यामागचं कारण...
3 / 9
भलेही ही स्वेटर जुनं आहे आणि दिसायला कॉमन आहे. पण हे ज्या व्यक्तीचं आहे ती व्यक्ती अजिबात कॉमन नव्हती. या स्वेटरची मालक असलेली महिला जगातील सगळ्यात प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक होती.
4 / 9
हे स्वेटर ब्रिटनची दिवंगत राजकुमारी डायनाचं आहे. ब्रिटनचे राजा चार्ल्सची पत्नी आणि प्रिंस हैरी व विलियमची आई लेडी डायनाचं हे स्वेटर आहे. जे लिलावात 9 कोटी रूपयांना विकण्यात आलं.
5 / 9
एबीसी न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, या स्वेटरचा लिलाव गेल्या गुरूवारी संपला. त्याआधी या स्वेटरवर साधारण 2 आठवडे लोक बोली लावत होते.
6 / 9
लिलाव करणाऱ्या कंपनीला अंदाज होता की, या स्वेटरला 41 ते 66 लाख रूपये मिळतील. पण या स्वेटरची किंमत वाढत गेली आणि शेवटी एका व्यक्तीने 1.1 मिलियन डॉलर म्हणजे 9 कोटी रूपयांची बोली लावून हे स्वेटर खरेदी केलं.
7 / 9
जून 1981 मध्ये चार्ल्सच्या साखरपुड्यानंतर प्रिन्सेस डायना एका पोलो मॅचमध्ये सहभागी झाली होती. तेव्हा ती 19 वर्षांची होती. त्यावेळी तिने हेच लाल स्वेटर घातलं होतं. तिचे फोटो त्यावेळी इतके चर्चेत आले होते की, तिचं स्वेटर एक स्टाइल स्टेटमेंट ठरलं होतं.
8 / 9
स्वेटरवर अनेक पांढऱ्या मेढ्यांमध्ये एक काळी मेंढी आहे. त्यावेळी लोक अंदाज लावत होते की, डायना या स्वेटरद्वारे संकेत देते की, ती रॉयल फॅमिलीमध्ये काळ्या मेंढीसारखी आहे. 1996 मध्ये तिने चार्ल्सला घटस्फोट दिला होता. त्यावेळी ती केवळ 36 वर्षांची होती. त्यावेळी पॅरिसमध्ये एका कार अपघातात तिचा मृत्यू झाला होता.
9 / 9
हे पहिल्यांदा नाहीये की, डायनाची एखादी वस्तू इतक्या महाग विकल्या गेली. याआधी तिचा एक बॉलगाउन 5 कोटी रूपयांना विकला गेला होता. आता सगळ्यात महागड्या स्वेटरचा रेकॉर्ड डायनाच्या या स्वेटरने तोडला.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके